streetlight  esakal
नाशिक

Nashik : पथदिपांवर आकडे टाकणाऱ्यांना इशारा

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिकेच्या (NMC) पथदीपांवर (Street Lights) अनेक ठिकाणी आकडे टाकण्यापासून जनावरे (Animals) बांधण्यापर्यंत वापर होतो. मात्र, पावसाळ्यात (Monsoon) हा पथदीपांचा वापर धोकादायक ठरून जीवितहानी होण्याचा धोका वाढल्याने महापालिकेने खबरदारीचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनेक प्रभागात पथदीपांचा नानाविध कारणांसाठी नागरिकांकडून अवैधपणे वापर सुरू असतो. (NMC warning regarding street lights for monsoon Nashik News)

अगदी महापालिकेच्या पथदीपाभोवती भिंती बांधून किंवा अतिक्रमित भिंतीत महापालिकेचा पथदीप असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. झोपडपट्टीमध्ये तर पथदीपाला शेळ्या, बकऱ्या गायी बांधलेल्या असतात. हा सगळा धोकादायक वापर पावसाळ्यात जिवावर बेतू शकतो. त्यामुळे पथदीपांची छेडछाड करू नका, असे महापालिकेने आवाहन केले आहे. सार्वजनिक रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरिता दिवाबत्तीची यंत्रणा विस्कळित होऊन अडचणी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पथदीपासाठी ३ फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो . पावसाळ्यात हा वीजप्रवाह नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे दिवाबत्ती खांब व यंत्रणेची छेडछाड करू नये. खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करू नये अथवा विनापरवाना वीजपुरवठा घेऊ नये. जनावरे वीज खांबाला बांधू नये. जंक्शन बॉक्सवर पाय ठेवून खांबावर चढू नये. कपडे वाळवण्याकरिता तारा पोलला बांधू नये. बांधकामामध्ये पोल घेऊ नये, आदी सूचना महापालिकेने केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT