water reduction esakal
नाशिक

NMC Water Reduction : पाणी कपातीची चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जून ते जुलै महिन्यात पॅसिफीक समुद्रात ‘अल निनो’ वादळ येणार असल्याने मोसमी पावसाळा लांबणीवर पडण्याच्या शक्यतेने पाणी कपातीच्या प्राथमिक नियोजनात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासंदर्भात बुधवारी (ता. ५) बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु शासनाला सादर करण्यात आलेल्या अहवाल संदर्भात काय अभिप्राय प्राप्त होतो, त्यानुसार कपातीचा निर्णय घेण्याचे ठरले. मात्र, अशा प्रकारचा निर्णय घेताना कपातीचे भूत आपल्याच अंगावर येण्याच्या भीतीने शासनाकडे चेंडू टोलावल्याचे बोलले जात आहे. (NMC Water Reduction decisions in court of state government nashik news)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

भारतीय हवामान विभागाने दक्षिण पॅसिफिक समुद्रात अल निनो वादळाचा अंदाज वर्तविला आहे. त्याचा परिणाम देशातील मॉन्सून पर्जन्यावर होण्याची दाट शक्यता असून, जून महिन्यानंतरदेखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना कराव्या लागेल. अशा सूचना देण्यात आल्या.

त्यानुसार पिण्याच्या पाण्याच्या टंचाई स्थिती हाताळण्याचे नियोजन करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई कृती आराखडा तयार करून शासनाला सादर केला. त्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कपातीचे नियोजन ठरले.

परंतु, धरणात पाणीसाठा असूनही कपात केल्यास राजकीय रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती निर्माण झाली. यामुळे शासनाला सादर करण्यात आलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यावर काय अभिप्राय येतो, त्यानंतर कपातीचा निर्णय घेण्याचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT