PM Kisan Yojana esakal
नाशिक

PM Kisan Yojana: शनिवारपर्यंत E-KYC न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ नाही

सिन्नर तालुक्यातील 7362 लाभार्थींची केवायसी तर 4687 लाभार्थींची आधार सिडिंग प्रलंबित

अजित देसाई

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे ई केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार सलग्न करणे व भुमिअभिलेख नोंदी अदयावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत.

शासनाच्या सुचनेनुसार जे लाभार्थी येत्या शनिवार (दि. 9) पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करनार नाहीत तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांची नावे पीएम किसान योजनेतुन वगळण्यात येणार आहेत. (No benefit of PM Kisan Yojana if E KYC not done by Saturday nashik)

सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात तालुक्यातील 7362 लाभार्थींची ई -केवायसी तर 4687 लाभार्थींची आधार सिडिंग प्रलंबित असल्याचे म्हटले आहे.

मागील मे महिन्यापासून ते आजपर्यंत या संदर्भात गावस्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करूनही केवायसी अपडेट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दि.9 सप्टेंबर ही केवायसी व आधार अपडेट करण्याची शेवटची मुदत आहे.

त्यानंतर 10 सप्टेंबर पासून प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवरून लाभार्थी सूचीतून अशा लाभार्थींची नावे वगळली जातील व योजनेच्या लाभापासून वंचित राहण्यास संबंधित खातेदार शेतकरी स्वतः जबाबदार राहतील असे श्री. नाठे यांनी म्हटले आहे.

ई केवायसी अपडेट करण्याकरीता मोबाईल फोनवरुन ओटीपी बेस, सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत व मोबाईल फोन वरुन पी एम किसान गुगल ॲपव्दारे चेहरा पडताळणी / प्रमाणिकरण (Face Authentication) हे तीन पर्याय आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बँक खाते आधार सलग्न करण्याकरीता ईंडीया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते उघडणे, स्वताचे बँक खाते आधार सलग्न करणे या बाबींचा वापर करुन पी एम किसान योजनेचा लाभ घेता येईल. केवायसी प्रलंबित लाभार्थ्यांची नावे ग्रामपंचायत, संबंधित गावचे कृषि सहाय्यक यांचेकडे उपलब्ध आहे.

"पी. एम किसान योजने अंतर्गत ई- केवायसी व बँक खाते आधार संलग्नीकरण 9 सप्टेंबर पर्यंत करण्यात यावे. 10 तारखेपासुन इ के वाय सी व आधार प्रमाणीकरण नसलेली लाभार्थींची नावे नावे रद्द करण्याची कार्यवाही शासन स्तरावरून केली जाईल याची सर्व शेतकरी बंधूंनी नोंद घ्यावी." - ज्ञानेश्वर नाठे (तालुका कृषि अधिकारी, सिन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT