wari-pandharpur.jpg 
नाशिक

यंदा पायी वारी करणाऱ्या ज्येष्ठांना 'नो एंट्री'?...पालखीबाबत पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

सकाळवृत्तसेवा

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पंढरपूर वारीला वर्षानुवर्षे ज्यांनी पायी वारी केली, अशा पालखीप्रमुखांसह ज्येष्ठ विश्‍वस्तांना वाहनातील पंढरपूर आषाढीवारीला नाकारण्याच्या प्रयत्नाने विश्‍वस्तांत नाराजी आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठांना टाळण्याच्या प्रशासकीय प्रयत्नांविरोधात विश्‍वस्तांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ग्राऱ्हाणे मांडले असून, शुक्रवारी (ता.26) श्री. भुजबळ यांच्याबरोबर बैठक होणार आहे. 

वारीच्या पूर्वतयारीचा भाग

त्र्यंबकेश्‍वरला गुरुवारी (ता.25) प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी आषाढीवारीबाबत संत निवृत्तिनाथ देवस्थान, पालिका, आरोग्य, पोलिस अशा विविध विभागांची बैठक घेत, वारीविषयी मते जाणून घेतली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नगर व सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या वारीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बैठक झाली. तीत शिवशाही बसमधून साधारणतः 20 जणांना प्रवेश देताना त्यात, पोलिस- वैद्यकीय पथकही असेल. त्यामुळे कमीत कमी लोक नेण्याच्या शासनाच्या सूचना असल्याने शासनाकडून येणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही होईल. अद्याप सूचना नसल्याने पूर्वतयारीचा भाग म्हणून बैठक असल्याचे प्रांताधिकारी चव्हाण यांनी प्रशासकीय नियोजनाची माहिती दिली. 

पालकमंत्र्यांकडून मध्यस्थी होणार

बैठकीत 65 वर्षांहून आधिक वयाच्या ज्येष्ठांना नेता येणार नसल्याचे सांगितल्यानंतर वारकरी विश्‍वस्तांचा असंतोष उफाळला. वर्षानुवर्षे वारीत तरुणांपेक्षा ज्येष्ठांचा सहभाग राहिला आहे. आता तर वाहनातून वारी होणार असताना, ज्येष्ठांनाच डावलणार असाल, तर फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठीच हा वारीचा खटाटोप करायचा का, अशा तक्रारी करीत, ज्येष्ठ विश्‍वस्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे तक्रार मांडली. त्यामुळे ज्येष्ठांबाबत पालकमंत्र्यांकडून शुक्रवारी मध्यस्थी होणार आहे. 

पालखीबाबत नियोजन करावे लागणार आहे. एका शिवशाही बसमधून वैद्यकीय पथक, पोलिसांसह वारीचे पदाधिकारी अशा 20 जणांना नेता येणार आहे. त्यासाठी आरोग्य पथकासह पूर्वतयारीचा भाग म्हणून बैठक होती. ज्येष्ठांच्या प्रवासाबाबत शासनाच्या सूचनांची कल्पना दिली. अद्याप निर्णय झालेला नाही. - तेजस चव्हाण, प्रांताधिकारी, त्र्यंबकेश्‍वर- इगतपुरी 

संत निवृत्तिनाथांची पालखी राज्यातील सात मानांच्या पालख्यांपैकी सव्वाशेहून अधिक वर्षांचा इतिहास असलेली पालखी आहे. वर्षानुवर्षे पायी चालणारे पालखीप्रमुख पुंडलिकराव थेटे, ज्येष्ठ विश्‍वस्त त्र्यंबकराव गायकवाड, रामभाऊ मुळाणे अशा ज्येष्ठांच्या वयाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबर बैठक होणार आहे. 
- पवन भुतडा, अध्यक्ष, निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्ट 

तरुणांपेक्षा ज्येष्ठांचा पायी वारीत सहभाग राहिला आहे. वर्षानुवर्षे जे पायी चालत आले आहेत, त्यांनाच वयाचे कारण देऊन वाहनातून प्रवेश नाकारणे योग्य नाही; अन्यथा वारकऱ्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांचीच वारी ठरेल. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालणार आहोत. 
- पुंडलिकराव थेटे, पालखीप्रमुख, संत निवृत्तिनाथ पालखी, त्र्यंबकेश्‍वर 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

SCROLL FOR NEXT