no helmet no petrol esakal
नाशिक

नो हेल्मेट- नो पेट्रोल नंतर आता No Helmet- No Co-operation

विनोद बेदरकर

नाशिक : पोलिस आयुक्तांनी नाशिक शहरात स्वातंत्र्यदिनापासून शहरात हेल्मेटसक्तीचा नियम केला आहे. हेल्मेटशिवाय पेट्रोलपंपावर विना हेल्मेट दुचाकीस्वाराला पेट्रोल देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पण त्याची अनेक ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही. उलट काही ठिकाणी पेट्रोल पंप चालकांशीच वाद घालण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे आता हेल्मेट सक्तीचा निर्णय आणखी कडक करण्यात येणार आहे. तसेच वाद घातल्यास, चॅप्टर केस दाखल करण्यात येणार आहे.

कॉलेज, शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी

विना हेल्मेट शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी कोचिंग क्लास, पार्किंग, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, आदीसह शहरातील केंद्र व राज्य शासकीय कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश नसणार आहे. पेट्रोलपंप चालकांना पंपावर सीसीटीव्ही (CCTV) लावण्याचा नियम सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेसह विविध शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कुठल्याही
शासकीय कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. विना हेल्मेट शासकीय कार्यालयात प्रवेश केल्यास ८ दिवसांचा तुरुंगवास किंवा १२०० रुपये दंडाची शिक्षा केली जाणार आहे. विना हेल्‍मेट वाहन धारक भांडल्यास दुचाकीस्वाराविरोधात १९७३ फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, १०७ नुसार चॅप्टर केस केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT