suraj mandhare 
नाशिक

कोरोना लसीकरणातून कुणीही राहणार नाही वंचित - सूरज मांढरे

महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला असली, तरी सर्वांना कायमस्वरूपी सुरक्षाकवच मिळावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व सरकारी विभाग केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने लसीकरणाचे शिवधनुष्य पेलणार आहे. लसीकरणातून कुणीही वंचित राहणार नाही, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी (ता. १८) येथे सांगितले. 

सर्व विभागांच्या समन्वयातून यश

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर आदी उपस्थित होते. श्री. मांढरे म्हणाले, की पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे आणि जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी, सरकारी यंत्रणांच्या सर्व विभागांच्या समन्वयातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यास यश मिळाले आहे. यासोबत नागरी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोरोना विषाणूला आळा घालण्यास यश मिळाले आहे. लसीकरणासाठी शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संघटना, आरोग्य यंत्रणा, वाहतूक विभाग यासोबत इतर लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी कलाकार, नाट्यप्रेमी यांची मदत घेतली जाणार आहे. 
 

कोरोना हद्दपार करण्यासाठी लवकरच लस उपलब्ध होणार आहे. लस आल्यानंतर आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण झाल्यानंतर नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर आणि हात स्वच्छ ठेवणे ही त्रिसूत्री पाळायचीच आहे. 
-लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाच्या माध्यमातून आपण कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले आहे. आगामी काळातील लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा एकवटलेली आहे. नागरिकांनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतरही जबाबदारीने नागरिकांनी वागले पाहिजे. 
- सचिन पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT