Damaged Road  esakal
नाशिक

Nashik News: 'ऐ भाई जरा देख के चलो' अंबासन ते निमधरा फाट्यावरील रस्त्यावर खड्डे दुरूस्तीचा मुहूर्त मिळेना

- दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : येथील निमधरा फाटापर्यंत रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात चाळण झाली असून 'ऐ भाई जरा देख के चलो, डाऐ भी नही बायें भी' अशी वाहनचालकांसह शेतीशिवारातील नागरिकांना म्हणण्याची वेळ आली आहे.

या अडीच किलोवर असलेल्या रस्त्यावर पायी चालणेही जिकिरचे झाले असून संबंधित विभागाला जाग येईल तरी कधी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. (No time to repair potholes on Ambasan to Nimdhara road Nashik News)

  गावाच्या विकासात भर पाडण्यासाठी गावात प्रवेश करणा-या रस्त्यांचा समावेश हमखास असतो. मात्र मालेगावकडील जाणा-या निमधरा फाटापर्यंत असलेल्या अंदाजे दोन ते अडीच किलोमीटर रस्त्यावरील उचकटलेली खडी व ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यातून वाहनचालकांसह शेतीशिवारातील शेतकऱ्यांना खडतर प्रवास करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांकडे संबधित विभागाकडून हेतूपुरस्पर डोळेझाक केली जात असून शहरी भागात मात्र सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर पुन्हा-पुन्हा मुलामा चढवून बिले काढले जात असल्याचा आरोप वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान संबंधित ठेकेदारांकडून ताहराबादकडील आदिवासीबहुल भागात रस्त्यावर निकृष्ट निकृष्ट होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. तसेच संभाजीनगर ते अहवा राज्य महामार्गावरील अंबासन फाट्यावरील मालेगाव तालुक्यातील सीमाहद्दीपासून ते काकडगाव गावानजीक रस्त्यावरील धोकादायक ठरत असलेल्या खड्ड्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून संबधित विभागाकडून डोळेझाक होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तक्रारीनंतर फक्त थातूरमातूर डागडुजी केली जाते मात्र काही दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यांच परिस्थिती 'जैसे थे' होत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत कायमस्वरुपी मार्ग काढावा अशी मागणी जोर धरत आहे तसेच निमधरा ते अंबासन गावापर्यंत रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होऊन बसले असून संबंधित विभागाने दखल घेऊन रस्ता दुरूस्ती करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

"अंबासन गाव ते निमधरा फाट्यापर्यंत रस्त्यावरील उचकटून पडलेल्या खड्डया व ठिकठिकाणी असलेले खड्डे प्रवासासाठी धोकादायक ठरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नाही. या रस्त्याची संबंधित विभागाने दुरूस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." - चंद्रकांत कोर, तालुका संघटक शिवसेना (ठाकरे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT