election esakal
नाशिक

12-14 वर्ष उलटूनही ग्रामसेवक एकाच गावात?

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : शासकीय सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियमितपणे बदल्या (transfers of officers and employees) करण्याच्या नियम आहे. पण हा नियम गावोगावच्या ग्रामसेवकांना लागू नाही का, असा सवाल होत आहे. याविरोधात येथील पंचायत समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार यांनी आवाज उठवला आहे. (no-transfers-of-Gramsevak-nashik-marathi-news)

१२ ते १४ वर्षांपासून एकाच गावात ड्यूटी

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांची प्रशासकीय बदली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तालुक्यात अनेकजण १२ ते १४ वर्षांपासून एकाच गावात ड्यूटी करत असून, यामुळे लोकप्रतिनिधींना न जुमानता कामकाज चालते. किंबहुना अनेकजण तर राजकीय हस्तक्षेप करत असल्याने आता तरी बदली व्हावी, अशी मागणी शेलार यांनी गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पांजरवाडी येथे १४, मालेगाव येथे १३ तर विखरणी, सायगाव, कोटमगाव बुद्रुक, खरवंडी, एरंडगाव बुद्रुक, आहेरवाडी, बाळापूर या ठिकाणी असलेले ग्रामसेवक १२ वर्षांपासून कार्यरत आहेत. अनकुटे येथील १० वर्षांपासून तर गणेशपूर, नेवरगाव, ममदापूर, खामगाव, सत्यगाव, नीळखेडा येथील ग्रामसेवक ९ वर्षांपासून या गावात कार्यरत आहेत. याशिवाय ग्रामविकास अधिकाऱ्यांचीही बदली न झाल्याने एकाच गावात कार्यरत आहेत. राजापूर येथील बारा, धुळगाव अकरा तर, नगरसूल, सावरगाव, देशमाने येथील ग्रामविकास अधिकारी नऊ वर्षांपासून कार्यरत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

तीन वर्षांपासून तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांची बदलीप्रक्रिया प्रलंबित आहे. यावर्षीही कोरोनामुळे प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. प्रशासकीय अडचण लोकप्रतिनिधींनाही मान्य आहे. मात्र काही ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी अनेक वर्षांपासून एकाच गावात मुख्यालयी असल्याने व शासनस्तरावर बदलीप्रक्रिया स्थगित असल्याने ग्रामसेवक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा अवमान केल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेक वर्षांपासून एकाच गावात असल्याने स्थानिक राजकरणात भाग घेऊन गोरगरिबांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सध्या ऐच्छिक बदली प्रक्रिया शक्य नसेल तरी प्रशासकीय बदली प्रक्रिया तातडीने करावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. ही मागणी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊनदेखील केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT