नाशिक

‘नो युपीआय’ आंदोलनाला सिमाचा पाठिंबा साडेचार हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा

CD
‘नो यूपीआय’ आंदोलनाला ‘सिमा’चा पाठिंबा साडेचार हजार कोटींचे व्यवहार ठप्पचा दावा सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ३ ः सिन्नर इंडस्ट्रिअल ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासह राज्यभरातील ७०० व्यापारी व औद्योगिक संघटनांनी ‘नो यूपीआय’ आंदोलनात सहभाग घेतला. यात साडेचार हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचे ‘सिमा’ने म्हटले आहे. दोन हजारांवरील निवडक यूपीआय व्यापारी व्यवहारांवर प्रस्तावित ०.४ टक्के एमडीआर शुल्काच्या निषेधार्थ शनिवारी (ता. २) राज्यभर ‘नो यूपीआय’ आंदोलनाला प्रतिसाद मिळाल्याचे ‘सिमा’ने म्हटले आहे. ‘सिमा’नेही उद्योजकांना याबाबत आवाहन केले होते. त्यास उद्योजकांनी प्रतिसाद देत आंदोलनात सहभाग घेतला. डिजिटल व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लावण्याच्या प्रस्तावाविरोधात सिन्नरमधील उद्योजकांनी केलेला निषेध राज्यातील व्यापारी व औद्योगिक संघटनांच्या व्यापक आंदोलनाचा भाग ठरला. या आंदोलनादरम्यान राज्यभरातील व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील नियमित डिजिटल व्यवहारांवर परिणाम झाल्याचे ‘सिमा’ने म्हटले आहे. ‘सिमा’चे सचिव बबन वाजे यांनी सिन्नरमधील व्यापारी आणि उद्योजकांनी युपीआय व्यवहारापासून दूर राहत निषेध नोंदविला. यूपीआय अधिक सक्षम आणि सर्वांसाठी सुलभ राहावे अशी ‘सिमा’ची भूमिका असल्याचे म्हटले आहे. उद्योग क्षेत्रात कच्चा माल, सुटे भाग, वाहतूक, देखभाल, विविध सेवा आणि पुरवठादारांना मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट केले जाते. त्यामुळे व्यावसायिक युपीआय व्यवहारांवर एमडीआर लागू झाल्यास व्यवहार खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी ‘सिमा’ने केली आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी केंद्र सरकार आणि एपीसीआयने या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन ‘सिमा’चे अध्यक्ष सुकुमार नायर, उपाध्यक्ष किरण भंडारी, विठ्ठल जपे, सचिव बबन वाजे, रतन पडवळ, अरुण चव्हाणके, मुकेश देशमुख, राहुल नवले, मारुती कुलकर्णी, शांताराम दारुंटे, सुधीर जोशी, नवनाथ नागरे, अतुल अग्रवाल, दत्ता नवले, प्रमोद कुटे, अरुण खालकर, नीलेश सोनवणे, गणेश तटाणे, सारंग कुलकर्णी आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT