oxygen cylinder.jpg 
नाशिक

ऑक्सिजनचा पुरवठा दुपटीने वाढविण्याचा निर्णय ; समन्वयासाठी नोडल अधिकारी 

विक्रांत मते

नाशिक : महापालिका रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर समस्येतून मार्ग काढण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा दुपटीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

ऑक्सिजनचा पुरवठा दुप्पट; समन्वयासाठी नोडल अधिकारी 
शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. वास्तविक कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्याच वेळी नियोजन करणे आवश्यक होते. किंवा महापालिकेने स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांवर ऑक्सिजन मागण्याची वेळ आली. सध्या शहरात १८ टक्के ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने सप्टेंबरपर्यंत ऑक्सिजन पुरवठा दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून जिल्हाधिकारी, शासन व रुग्णालयांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी सोपविल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. नागरिकांनी भीती बाळगू नये, उपचारासाठी महापालिकेची वैद्यकीय सेवा सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टॅंकर मिळत नसल्याने उद्योगांकडे सध्या उपलब्ध असलेले गॅस टँकर ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी मिळावेत व तशी परवानगी द्यावी, अशी मागणी आयुक्त जाधव यांनी राज्य सरकारकडे केली.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

SCROLL FOR NEXT