नाशिक

कर्णर्कश आवाजात डि.जे.वाजवणे पडले महागात

CD
कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणे पडले महागात तीन साऊंड सिस्टिम चालकांवर गुन्हे दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२८ : शहरातील रथ चौक परिसरात, टॉवर चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना व कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टिम वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या साई बँड, श्रीहरी ब्रास बँड आणि कन्हैया सरस्वती बँड या तीन बँड मालकांविरुद्ध एकाच दिवशी शनिपेठ आणि शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रथ चौकात सोमवारी (ता.२६) सायंकाळी साई बँडच्या मालकाने मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम वाजविली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण झाले. या प्रकरणी पोलिस नाईक गणेश ढाकणे यांच्या तक्रारीवरुन साऊंड सिस्टिमचे मालक मोहन आर. पाटील (रा. म्हसावाद, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक वसीम शेख तपास करीत आहेत. दुसरा गुन्हा ''श्रीहरी ब्रास बँड''चे मालक मालक पवन कोळी (रा. विरवाडे, ता. चोपडा) यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला. त्यांनी रविवार सायंकाळी मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम वाजविली. याप्रकरणी पोलिस नाईक रवींद्र तायडे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात स्टेशन) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक विजय खैरे तपास करीत आहेत. चौकट ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हा शहरातील शास्त्री टॉवर चौकात सोमवारी (ता.२६) कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टिम वाजवून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी कन्हैया सरस्वती बँडचे मालक रतनराव गायकवाड (रा. भोकर, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध पोलिस नाईक शिवाजी नाईक यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस अंमलदार रामचंद बोरसे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Numerology: करिअरमध्ये मोठी रिस्क घ्यायला घाबरत नाहीत 'या' मूलांकाचे लोक; नवीन स्किल्स शिकण्यात असतात नंबर वन!

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

SCROLL FOR NEXT