(पान १ ला सेकंड मेन)
-----------------
फोटो : NSK26H33067
नंदुरबार : शिक्षक दरबारात बोलतांना आमदार किशोर दराडे समवेत चंद्रकांत पवार, भानुदास रोकडे, नितीन पाटील, वंदना वळवी,भावेश सोनवणे आदी.
-------------------
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध
आमदार किशोर दराडे : नंदुरबारला शिक्षक दरबारला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २० : शिक्षकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आमदार किशोर दराडे यांनी सोमवारी (ता. १९) नंदुरबारमध्ये शिक्षक दरबार घेतला. या वेळी जिल्ह्यातील शिक्षकांनी विविध प्रश्न मांडले. शिक्षकांचे प्रश्न गांभीर्याने सोडविले जातील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, वेतन अधिक्षक नितीन पाटील, उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे आदी उपस्थित होते.
शिक्षण उपसंचालकांकडे शालार्थ आयडीचे फेब्रुवारीपासून एक हजारपेक्षा अधिक प्रस्ताव पडून आहेत. मात्र, अद्यापही आयडी मिळालेले नाहीत, अशी तक्रार या वेळी शिक्षकांतर्फे करण्यात आली. कार्यालयात उपसंचालक उपलब्ध नसल्याने शालार्थ आयडी प्रस्तावांना मान्यता मिळत नाहीत. त्याचप्रमाणे २०२५ ते २०२६ या काळात सुमारे १० ते १५ शाळांना संच मान्यता मिळालेल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर या शाळांचे वेतन मिळणार नाही, याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण सेवकांचा कालावधी पूर्ण होऊन त्यांना नियमित करण्यात आले आहे. अशा शिक्षकांचे प्रस्ताव पाठवूनही मान्यता मिळत नाही. त्यामुळे नियमित वेतनश्रेणी मिळण्यात अडचणी येणार आहेत. अल्पसंख्यांक शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या नेमणुकांना मान्यता मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. एकसंच वेतनश्रेणीचा लाभ पात्र शिक्षकांना मिळाला पाहिजे. आदिवासी भागात काम करणाऱ्या १००० ते १५०० शिक्षकांसंदर्भात न्यायालयाने निकाल दिलेला असतानाही लाभ दिला जात नाही आदी तक्रारी विविध संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांतर्फे करण्यात आल्या. या तक्रारींची आमदार किशोर दराडे यांनी गंभीर दखल घेतली.
या वेळी शिक्षक नेते संभाजी पाटील, संजय चव्हाण, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष भरत सावंत, मुख्याध्यापक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोरखनाथ बोराणे, मुख्याध्यापक संघाचे पुष्पेंद्र रघुवंशी, नाशिक विभागीय शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाह डी. पी. महाले, ॲंग्लो उर्दु स्कुलचे प्राचार्य इसरार जहागिरदार, प्राचार्य निंबा माळी, डॉ. एन. डी. नांद्रे, हरिष मुंडे, प्रदीप पाटील, जयेश वाणी, संजय भामरे, राहुल खैरनार, एन. डी. पाटील आदी उपस्थित होते.
--------
जिल्हास्तरावरील अडचणी
तत्काळ सोडवाव्यात
या वेळी आमदार दराडे यांनी शिक्षकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यात एकस्तर वेतनश्रेणीतील बिल फरक दोन टप्प्यात देण्यात यावे, असे निर्देश दिले. शैक्षणिक अडीअडचणी असल्यास शिक्षकांनी मांडाव्यात. त्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असे ते म्हणाले. उपसंचालक रूजू झाल्यानंतर तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन तातडीने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन आमदार दराडे यांनी दिले. जिल्हास्तरावर अडचणी असल्यास तत्काळ सोडविण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.