नाशिक

रिपोर्ट नॉर्मल, तरी त्रास का?

CD
फोटो -NSK26H31624 रिपोर्ट नॉर्मल, तरी त्रास का? ------------------------ ‘डॉक्टर, माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत; पण मला अजूनही बरं वाटत नाही.’ डॉक्टरांकडे येणाऱ्या अनेक रुग्णांकडून हे ऐकायला मिळते. डोकेदुखी, छातीत अस्वस्थता, चक्कर, पोटाच्या समस्या, श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा, वेदना, हृदयाची धडधड किंवा सततचा थकवा अशी लक्षणे जाणवतात. मात्र, तपासण्या आणि स्कॅन नॉर्मल आल्याने अनेकदा रुग्णाचा त्रासच नाकारला जातो. - डॉ. किरण शांडिल्य ‘तुम्हाला काहीही झालेले नाही; हे सगळे तुमच्या डोक्यात आहे,’ असे म्हणणे चुकीचे आहे. कारण लक्षणे आणि त्यांचा अनुभव खरा असतो. मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध आहे. ताणतणाव, चिंता, नैराश्य, भावनिक आघात, अपुरी झोप आणि मानसिक थकवा यांचा वेदना, पचन, श्वासोच्छ्वास, स्नायूंचा ताण आणि हृदयाच्या धडधडीवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर हृदयाच्या तपासण्या नॉर्मल आल्या तरी हृदयाबाबतची चिंता कायम राहू शकते. ही चिंता वाढल्यास शारीरिक लक्षणे अधिक तीव्रतेने जाणवू शकतात. सध्याच्या तपासण्यांमधून लक्षणांचे स्पष्ट शारीरिक कारण सापडलेले नाही, एवढाच त्याचा अर्थ असतो. नवीन किंवा सतत राहणारी लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. योग्य वैद्यकीय तपासणीसोबत गरज असल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणेही उपयुक्त ठरू शकते. याचा अर्थ ‘वेडेपणा’ असा अजिबात नाही. कुटुंबीयांनी ‘नाटक करू नकोस’ म्हणण्याऐवजी, ‘तुला त्रास होत आहे, आपण योग्य मदत घेऊया,’ अशी भूमिका घ्यावी. रिपोर्ट नॉर्मल असले तरी त्रास खरा असू शकतो; योग्य समज आणि उपचार महत्त्वाचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT