hospitals 123.jpg
hospitals 123.jpg 
नाशिक

रुग्णाला आकारले अव्वाच्या सव्वा बिल...हॉस्पिटलला बिल परत करण्याची नोटीस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वडाळा येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयाने कोरोनावर उपचार करण्यात आलेल्या एका रुग्णाला उपचारापोटी आकारले तीन लाख दहा हजार रुपयांचे बिल अमान्य करत एक लाख २५ हजार रुपये सात दिवसांच्या आत रुग्णाला परत करण्याची नोटीस महापालिकेने काढली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात कोरोनाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले लावून लूट होत असल्याबाबत महापालिकेच्या तांत्रिक समितीने शिक्कामोर्तब केले आहे. 

कोरोना रुग्णाला अतिरिक्त बिल दिल्याचा ठपका 
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचारासाठी जात आहेत. रुग्णाला डिस्चार्ज घेण्याची वेळ येते, त्या वेळी हातात पडलेल्या उपचाराचे बिल पाहून अनेकांचे डोळे पांढरे होतात. महात्मा फुले योजनेंतर्गत साठ हजार रुपयांमध्ये उपचार होत असताना खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याविरोधात शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘सकाळ’कडे तक्रारी केल्यानंतर या मुद्द्यावर वृत्तमालिकेच्या माध्यमातून ‘सकाळ’ने खासगी रुग्णालयांच्या दुकानदारीवर प्रकाश टाकला. त्यानंतर एकापाठोपाठ एक तक्रारी समोर येत असल्याने राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला. शासनाकडेही तक्रारी केल्या. 

सात दिवसांच्या आत बिल परत करण्याचे आदेश
महापालिकेने तातडीने पावले उचलत सहा विभागांत भरारी पथकांची नियुक्ती केली. प्रत्येक कोविड रुग्णालयाचे ऑडिट करण्याचा निर्णय घेताना २२ लेखापरीक्षकांची नियुक्ती केली. शिवसेना व नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार महापालिकेच्या तांत्रिक समितीने अशोका मेडिकव्हर रुग्णालयात एका रुग्णाला आकारलेल्या बिलासंदर्भात चौकशी केली. या रुग्णाला तीन लाख दहा हजारांचे बिल आकारले होते. महापालिकेच्या तांत्रिक समितीने बिलांची तपासणी केल्यानंतर त्यात नियमानुसार बिले न आकारल्याचे समितीला आढळले. त्यानुसार अशोका मेडिकव्हरने रुग्णाला दिलेले तीन लाख दहा हजारांचे बिल अमान्य करत रुग्णालयाला एक लाख ८४ हजारांचे बिल आकारणी करावी व उर्वरित एक लाख २५ हजार रुपये अतिरिक्त असल्याचा निष्कर्ष काढत सात दिवसांच्या आत रक्कम परत करण्याची नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत बिल परत करून त्याची पावती महापालिकेला देण्याचे आदेशित करण्यात आले, अन्यथा मुंबई नर्सिंग होम ॲक्ट व आपत्कालीन साथरोग आजार १८९७ भारतीय दंडसंहिता १९६० नुसार कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

‘बिलामध्ये औषधांचा समावेश’ 
अशोका मेडिकव्हर रुग्णालयात आकारलेल्या बिलामध्ये अधिकाधिक औषधे व तपासणी शुल्काचा समावेश आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाने उपचारावर आपण समाधानी असल्याचे लेखी दिले आहे. प्रत्येक रुग्णाला सरकारी नियमानुसार सारख्याच पद्धतीची औषधे लागतील असे नाही. अतिजोखमीच्या काळात रुग्णाचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उच्चप्रतीचे प्रतिजैवक औषधे द्यावी लागत असल्याचे अशोका मेडिकव्हरचे डॉ. समीर तुळजापूरकर यांनी ‘सकाळ’शी बाेलताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT