Dinkar Patil esakal
नाशिक

Nashik News: भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना नोटीस! देवीदास पिंगळे यांच्या बदनामीचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी माजी खासदार तथा नाशिक बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी पत्रके वाटली होती. या पत्रकातील मजकुरातून वैयक्तिक बदनामी झाल्याचा आरोप करीत देवीदास पिंगळे यांनी वकिलामार्फत दिनकर पाटील यांना नोटीस बजावली आहे.

पाटील यांनी तातडीने याबाबत लेखी माफी मागावी, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण पाटील यांना भोवणार असल्याची चर्चा सहकार वर्तुळात रंगली आहे. (Notice to former BJP corporator Dinkar Patil Accusation of defamation of Devidas Pingle Nashik News)

माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी संस्थेचे कार्यक्षेत्र असलेल्या गावांमध्ये देवीदास पिंगळे यांच्या विरोधातील बदनामीकारक मजकूर असलेली पत्रके वाटली. या पत्रकबाजीमुळे जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करीत देवीदास पिंगळे यांनी दिनकर पाटील यांना ॲड. मंदार भानोसे यांच्यामार्फत पोस्टाद्वारे नोटीस बजावली आहे.

दिनकर पाटील यांनी पत्रकात छापलेल्या मजकुराच्या अनुषंगाने लेखी माफी मागावी तसेच, भविष्यात अशा प्रकारे बिनबुडाचे आरोप करणार नाही, याची लेखी हमी द्यावी. अन्यथा, भारतीय दंड संहिता कलम ५०० व ५०१ नुसार झालेल्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करून फौजदारी व दिवाणी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असे या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

"दिनकर पाटील यांना नोटीस बजावण्यात आली असून, बोध चिन्हाचा गैरवापर केला म्हणून फौजदारी करणार आहोत. तसेच संचालक मंडळाने माजी नगरसेवक दिनकर पाटील यांचे सदस्यपद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

- पंडितराव कातड-पाटील, अध्यक्ष, सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT