grain distribution scam in bazar samiti esakal
नाशिक

Bazar Samiti Scam : कथित घोटाळ्याप्रकरणी उपनिबंधकांकडून नोटिसा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कथित धान्यवाटप घोटाळा, तसेच गाळे विक्रीत एक कोटी १६ लाखांच्या आर्थिक नुकसानीचे प्रकरण जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांच्याकडे सोपविताच त्यांनी तातडीने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी (ता. २५) ठेवली आहे. (Notices from Deputy Registrar in case of bazar samiti grain distribution scam nashik news)

बाजार समितीच्या सचिवांना पत्र पाठवत या प्रकरणाशी संबंधित वादी व प्रतिवादींना तातडीने नोटीस बजाविली आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २७) होणाऱ्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीचे काय होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पिंगळे गटाने १२ जागांवर बाजी मारत सत्ता राखली असली तरी या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे व माजी सभागृहनेते दिनकर पाटील या जोडीने पुन्हा शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निवडणुकीपूर्वी चुंभळे यांनी पिंगळेंसह संचालक मंडळावर बाजार समितीचे एक कोटी १६ लाखांचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. त्यावर प्रकरणाची चौकशी करून बाजार समितीच्या संचालक मंडळाला दोषी ठरवून त्यांच्याकडून सदरचा खर्च वसूल करण्याचे आदेश दिले होते.

उपनिबंधकांचे आदेश पणन संचालकांनी रद्द केले होते. त्यावर चुंभळे यांनी पणनमंत्र्यांकडे अपील दाखल केले. त्यावर मुख्यमंत्री तथा पणनमंत्री शिंदेनी सुनावणी घेत पणन संचालकांचा आदेश रद्द करत जिल्हा उपनिबंधकांना याबाबत कारवाईचे निर्देश दिले आहेत. सदरचे आदेश प्राप्त होताच जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारीच सुनावणीचे आदेश काढत २५ मेस सुनावणी ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

Mumbai Crime: पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद पेटला, कोयता उपसला अन्...; सीएसएमटीबाहेर थरारक घटना

Bride Theft Case : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू भावोजीसोबत फरार, पोलीस तपासात खळबळजनक सत्य उघड; पतीसह कुटुंबाला मोठा धक्का !

Latest Marathi News Update : पंढरपुरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Samruddhi Road Accident : चिमुरडीचं हसू कायमचं हरपलं! समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत, थरकाप उडवणारा अपघात

SCROLL FOR NEXT