Political News
Political News esakal
नाशिक

Nashik : संपर्क कार्यालयावरून राष्ट्रवादी, शिंदे गट आमनेसामने; कार्यालय 1 फलक मात्र 2

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जून महिन्यात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय परिस्थिती स्थिरस्थावर होत असताना आता सरकारी मालमत्तांवर कब्जाची लढाई सुरू झाली आहे. नाशिकच्या उंटवाडी रोडवर जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कार्यालयात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयावर पालकमंत्री दादा भुसे यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. राजकीय वाद वाढू नये म्हणून स्वतंत्र कार्यालय असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे.

उंटवाडी रोडवर जलसंपदा विभागाचे अखत्यारित जुनी वास्तू आहे. मागील सत्ताकाळात गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना नागरिकांना सहज संपर्क करता यावा यासाठी तेथे महाजन यांनी कार्यालय सुरू केले होते. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ यांची निवड झाली. (Now Battle for possession of government properties NCP and Shinde group both in competition Nashik Political News)

झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तसेच उपाध्यक्ष हे मोठे पद मिळाल्याने त्यांच्याकडे नागरिकांचा राबता वाढला. त्यामुळे झिरवाळ यांनीदेखील उंटवाडी रोड येथे कार्यालय थाटले. मात्र, तीन महिन्यापूर्वी राज्यात शिंदे गट व भाजप युतीचे सरकार स्थापन झाले.

त्यात नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मालेगावचे दादा भुसे यांच्याकडे आली. नाशिक मुख्यालय असल्याने त्यांच्याकडे सातत्याने नागरिकांची ये- जा आहे. त्यामुळे शहरात संपर्क कार्यालय असणे गरजेचे आहे, ही बाब हेरून भुसे यांनीदेखील झिरवळ यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर स्वतःचा फलक लावून कार्यालयावर कब्जा केल्याचे बोलले जात आहे. उंटवाडी रोड वरून फेरफटका मारल्यास कार्यालय एक मात्र दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्क कार्यालयाचे फरक नजर दर्शनास येत असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का! पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद

SCROLL FOR NEXT