UPI New Features esakal
नाशिक

Online Pay: आता ‘हॅलो UPI’ म्हणत करू शकता पैसे ट्रान्सफर! नवनवीन तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार सुलभ पण...सावधान!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी एकापेक्षा अनेक पर्याय आज वापरात असले तरी त्यात नवनवीन पर्यायही येऊ लागले आहेत.

युपीआयच्या माध्यमातून क्युआर कोड स्कॅन करून आर्थिक व्यवहार करणे आता सर्वश्रुत झालेले असताना, आता युपीआयच्या हॅलो युपीआय या नवीन फिचरच्या माध्यमातून सहज आर्थिक व्यवहार करता येणे सोपे झाले आहे.

तर काही दिवसातच याचे पुढचे व्हर्जन व्हॉईज फिचरही लवकरच येण्याचीही शक्यता आहे. (Now you can transfer money by saying Hello UPI New technology makes financial transactions easier beware of cyber fraudster nashik)

अलिकडे ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. तरीही ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यासाठी नवनवीन फिचर्स येत आहेत. नवनवीन वॉलेट येत आहेत.

क्युआर कोड स्कॅन करून युपीआयवरून पैशांची देवाणघेवाण होत असताना असताना त्यात मोठा बदल होताना दिसत आहेत. तो म्हणजे चॅटिंग करतानाच युपीआयच्या माध्‌यमातून पैसे पाठविता येऊ शकतात.

चॅटिंग करून युपीआयला एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवू शकतो. हॅलो युपीआय पे वरुन .@ संबंधित व्यक्तीचे युपीआय नाव असे मेसेज करताच तुमचे पैसे त्या व्यक्तीच्या खात्यावर पोहोच होतात.

यात युपीआयवर क्रेडिट लाईनचा वापर करता येऊ शकतो. क्रेडिट लाईन वापरून युपीआय पेमेंट करू शकता. एखादं क्रेडिट कार्ड बँककडून घेता, तसंच युपीआय क्रेडिट कार्ड वापरू शकता. खात्यामध्ये पैसे नसेल तर एका लिमिटपर्यंत तुम्ही पैसे खर्च करू शकता आणि नंतर पुन्हा भरू शकता.

ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी नवनवीन फिचर्स अनेक सोयीसुविधा घेऊन येत आहेत. यामुळे पैसे पाठवणे आणि पैसे मिळविणे अतिशय सोपे होते आहे.

पण हे करीत असताना फसवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटचा व्यवहार करण्यासाठी नवीन फिचर्स वापरताना काळजी घेण्याचीही आवश्यकता आहे.

"ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी एकापेक्षा अनेक वॉटेल आहेत. युपीआय फिचर्स वाढत आहेत. यामुळे पैसे तात्काळ ट्रान्सफर होतात परंतु ते करीत असताना खात्रीशिर आणि सावधगिरी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे."- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT