Onion  esakal
नाशिक

Nashik Onion News : जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला ‘कांदा’

Nashik : लोकसभेच्या तिन्ही टप्यात कांद्याचे दर, कांद्यावरील निर्यातबंदी यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील विविध सभांमधून देखील विरोधकांनी कांदा प्रश्नावर रान उठवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा, तर, महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा झाली. या सभांमधून राजकीय आरोप-प्रत्यारोप झालेले असले तरी, सभांच्या केंद्रस्थानी जिल्हयाचा कांदा असल्याचे दिसून आले. (Onion issue remains at center of meetings in district)

जिल्ह्यातील कांदा प्रश्न सध्या देशपातळीवर चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या तिन्ही टप्यात कांद्याचे दर, कांद्यावरील निर्यातबंदी यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील विविध सभांमधून देखील विरोधकांनी कांदा प्रश्नावर रान उठवले आहे.

तर, जिल्ह्यातील भाजपनेही या प्रश्नांची काहीशी धास्ती घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे कांदा प्रश्न निवडणुकीत ऐरणीवर आलेला आहे. यातच, अंतिम टप्यातील राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या सभांमध्येही कांदा प्रश्न गाजत आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान होत आहे.

त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून नेत्यांच्या सभांचा धुराळा सुरू आहे. बुधवारी महायुतीच्या उमेदवारांसाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदी यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे, दादा भुसे आदींच्या उपस्थितीत सभा झाली. (latest marathi news)

या सभेत, मंत्री भुजबळ यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धर्तीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहन पर रक्कम दिली जावी अशी मागणी करत हा प्रश्न उपस्थित केला.

तर, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही कांदा प्रश्नाला हात घालत कांद्याचे कायमस्वरूपी निर्धारित मुल्य निश्चित करण्यासाठी धोरण आखले जाईल असे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी भाषणात, कांदा प्रश्नांवर भाष्य करण्यास एका शेतकऱ्यांनी भाग पाडले. पंतप्रधान मोदी यांनी कांदा प्रश्नी करत असलेल्या धोरणांचा पाढा वाचला.

शहरात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेतही त्यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याचे मुद्दा उपस्थित केला. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे झालेल्या सभेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कांदा उत्पादकांना बोलू दिले जात नसून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार; विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT