Accidental vehicles seen on Mumbai-Agra highway.  
नाशिक

Mumbai Agra Highway: मुंबई महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; अपघातप्रवण क्षेत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Agra Highway: सर्वाधिक वर्दळीचा मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातांचे केंद्रबिंदू तयार होत आहेत. रोजच कुठे ना कुठे अपघात होत आहेत. यामुळे लोकांचे बळी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे.

याचे घोटी आणि पिंपळगाव बसवंत टोलनाका प्रशासनाला काहीही सोयरसूतक नाही. इगतपुरी तालुक्यात अपघात रोखण्यासाठी उपाययोजनाबाबत प्रशासनाला भाग पाडले जात नाही. सर्वसामान्य आधीच महागाईचा आगडोंब आणि अनेक समस्यांनी हैराण झाला आहे.

शनिवारी (ता. २) याच मार्गावरील मुंढेगाव फाट्यावर अविनाश गतीर या निष्पाप तरुणाचा हकनाक बळी गेला. (number accidents increasing on Mumbai Agra highway nashik news)

दहा हजार नागरिकांनी प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आतापर्यंतचे मोठे रास्ता रोको आंदोलन केले. अजूनही संबंधित यंत्रणेने याप्रकरणी दक्षता न घेतल्यास लोक आक्रमक व्हायला अजिबात वेळ लागणार नाही.

हे आहेत महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र

मुंढेगाव फाटा, कसारा घाट, तळेगाव फाटा, पिंप्री सद्रोद्दीन फाटा, बोरटेंभे फाटा, घोटीचा सिन्नर फाटा परिसर, वैतरणा फाटा, घोटीजवळ सुरू असलेले पुलाचे काम, माणिकखांब येथील तीव्र स्वरूपाची वळणे, पाडळी फाटा, गोंदे थायसनकृप कंपनी परिसर, प्रभू ढाबा भागातील हॉटेलांमध्ये येणारी वाहने आणि त्याच भागातून विरुद्ध दिशेने गोंदे फाट्याकडे येणारी वाहने, गोंदे फाटा ते व्हीटीसी फाट्यापर्यंतचा परिसर, वाडीवऱ्हे परिसर ते रायगडनगरपर्यंतचा परिसर, रस्त्यात अचानक येणारी जनावरे, अशा अनेक कारणांमुळे अपघातांची मालिका वाढायला मदत होत आहे.

या उपाययोजना गरचेच्या

मुंढेगाव, गोंदे फाटा, वाडीवऱ्हे, व्हीटीसी फाटा येथे पूल, वर्दळीच्या भागात पादचारी पूल, जनावरांना रस्त्यावर येऊ न देण्यासाठी संरक्षक जाळ्या, सर्वच ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक, गती नियंत्रणासाठी फलक आणि कॅमेरे, तीव्र वळण काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, वाहतूक नियमांचा जागर, असे अनेक उपाय करण्याची आवश्यकता आहे.

निवेदन, रास्ता रोको किती वेळा करणार

अपघात झाले, की त्या- त्या भागातून निवेदने देऊन प्रशासनाकडे केविलवाणी याचना केली जाते. इशारे दिले जातात. मात्र, काही दिवसांनी पुन्हा शांतता होते. यामुळे प्रशासनाचेही दुर्लक्ष होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी सामान्य लोकांच्या न्याय हितासाठी एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय अपघातांची संख्या कमी होणार नाही.

अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी टोलनाका प्रशासनाकडून सेवा बऱ्याचदा मिळत नाही. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वरातीमागून घोडे दामटत उशिराने येते. जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची गोंदे फाट्यावर मोफत रुग्णवाहिका २४ तास अखंडित सेवा देत आहे. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचविले आहेत. अशा प्रकारच्या मोफत आणि आवश्यक सेवांना पाठबळ देण्यासाठी सेवाभावी नागरिकांनी स्वतःहून पुढे यायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT