bird.jpg 
नाशिक

किलबिलाट वाढतोय! नाशिकमध्ये वाढली घारींची संख्या; 'चला पक्षी बघू' उपक्रमात नोंद

महेंद्र महाजन

नाशिक : पक्षी सप्ताहानिमित्त नेचर क्लबतर्फे नाशिकमध्ये रविवारी (ता. ९) चला पक्षी बघू या...उपक्रम राबवण्यात आला. शहरातील विविध भागातील पक्षी गणनेचा समारोप गोदापार्कमध्ये झाला. पक्षीनिरीक्षणामध्ये कोरोना विषाणू संसर्गात किलबिलाट वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच गंगापूर रोड, गोदापार्क, तपोवन, गंगापूर धरण, जूने नाशिक, पांडवलेणी परिसरात करण्यात आलेल्या पक्ष्यांची नोंदणीमध्ये घारींची संख्या वाढल्याचे आढळून आले. 

पान कावळ्यांची कॉलनीमध्ये किलबिलाट

शहरातील पक्ष्यांची संख्या, त्यांची घरट्यांची स्थाने, जल प्रदूषण, नायलॉन मांज्या आदींचा अभ्यास पक्षीनिरीक्षणावेळी करण्यात आला. अशोक स्तंभ परिसरातील पोपटाचे झाड, पोस्ट ऑफिस जवळील घारीची कॉलनी, गाडगे महाराज धर्मशाळेतील बगळ्यांची कॉलनी, पोलिस प्रशिक्षण अकादमी आणि गंगा घाटाजवळील साळुंकीची कॉलनी, सामाजिक वनीकरण रोपवाटिकेजवळील सस्तन प्राणी वट वाघळांची कॉलनी, रामवाडी पुलाजवळील पान कावळ्यांची कॉलनीमध्ये किलबिलाट वाढल्याचे दिसून आले. चाळी, वाड्यांच्या जागी गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे अनेक पक्षी स्थलांतर करत असल्याचे पाहावयास मिळाले. 

चिवचिवाट वाढलायं 

गोदावरी नदी पात्रात पोंड हेरॉन या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. या पक्ष्यांची संख्या वाढली की, नदीतील प्रदूषण वाढल्याचे निरीक्षण पक्षीमित्र नोंदवतात. नदी पात्रातून स्वच्छ पाण्यात राहणाऱ्या किंगफिशरची कमी झालेल्या संख्येचा त्यासाठी दाखला दिला जातो. नाईट हेरॉन हा पक्षी अनेक ठिकाणी वृक्षांवर घरटे बनवताना दिसून आला. रामकुंडाजवळ कावळ्यांनी घरटी बांधल्याचे दिसले. रुंग्ठा हायस्कूल, अभिनव विद्यामंदिर, सारडा विद्यालयाजवळ चिमण्यांचा चिवचिवाट पक्षीमित्रांनी ऐकला. नायलॉन मांज्यावर बंदी असताना अनेक वृक्षांवर मांजा लटकलेला पाह्यला मिळाला. शहरात दहा ते पंधरा हजाराहून अधिक कबुतरांची निरीक्षणामध्ये नोंद झाली. एवढेच नव्हे, तर जंगलात राहणारे अनेक पक्षी शहरात आल्याचे देखील दिसून आले. मलबारी मैना हजारोच्या संख्येने आढळल्या आहेत. या उपक्रमात रवींद्र वामनाचार्य, किशोर वडनेरे, डॉ.जयंत फुलकर, सागर बनकर, अपूर्व नेरकर, मेहुल थोरात, हितेश पटेल, दर्शन घुगे, रिद्धी येवला, आकाश जाधवआदी सहभागी झाले होते. 

निलगिरीवर पक्ष्यांची जत्रा

निलगिरी वृक्षांवर पक्षी येत नाहीत, घरटे करत नाही, अशी समजूत आहे. त्याचअनुषंगाने संस्थेतर्फे महिनाभर गंगापूररोड वरील एका निलगिरी वृक्षाचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये त्या वृक्षावर तीस जातीच्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाला. तसेच घारी घरटे बांधण्यासाठी या वृक्षाची निवड केल्याचे आढळून आले. त्यातूनच सर्व वृक्ष पक्ष्यांचे मित्र असल्याची प्रतिक्रिया पक्षीमित्रांमधून उमटली. 

उपक्रमात नोंदवलेल्या पक्ष्यांची संख्या 

घार : ३५० 
पोपट : १ हजार २०० 
कावळे : ७५० 
वेडा राघू : २०० 
साळुंकी : ८५० 
राखी धनेश : ३० 
सूर्यपक्षी : ५० 
तांबट : ४५० 
कोकीळ : १२० 
शिकरा : २० 
मलबारी मैना : १ हजार २०० 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT