corona fight corona fight
नाशिक

दिलासादायक! मालेगावात कोरोना रुग्णसंख्या येतेय आटोक्यात

शहरात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पंधरा दिवसांनी दीड हजाराच्या खाली तर तालुक्यात महिन्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या साडेचारशेच्या खाली आली.

प्रमोद सावंत


मालेगाव (जि. नाशिक) : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Coronavrus) रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. शहरात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पंधरा दिवसांनी दीड हजाराच्या खाली तर तालुक्यात महिन्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या (Active Patients) साडेचारशेच्या खाली आली. आगामी काही दिवस नियमांचे कठोर पालन झाल्यास कोरोनाची साखळी खंडित होऊ शकेल. (number of active corona patients is declining in Malegaon)


मालेगाव शहरातील कॅम्प-संगमेश्वरच्या पश्चिम भागात कोरोना ठाण मांडून आहे. पंधरा दिवसापासून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दोन हजारापेक्षा अधिक होती. शहरात 7 मेस 68, 8 मेस 17, 9 मेस 115, 10 मेस 25, 11 मेस 6, 12 मेस 52 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने ॲक्टिव्ह रुग्ण हे देखील दीड हजाराच्या खाली आले आहेत.

नागरिकांमध्ये जागृतता..

तालुक्याच्या ग्रामीण भागातही परीस्थिती सुधारू लागली आहे. पंधरा दिवसापूर्वी तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण हजाराच्या घरात गेले होते. गावागावात मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी शेतमळ्यांमध्ये निवारा शोधला आहे. निर्बंधांचा कमी प्रमाणात का होईना फायदा होताना दिसत आहे. तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 418 पर्यंत खाली आहे. कोरोना संदर्भात नागरिकांमध्ये बऱ्यापैकी जागृतता आली आहे. लग्नसोहळ्यांचा धडाका बंद होतोच रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. लसीकरणासाठी नागरिकांची उदासीनता दूर झाली आहे. नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनाला अटकाव घालतानाच लसीकरणासाठी होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाला कसरत करावी लागणार आहे.

(number of active corona patients is declining in Malegaon)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Accident Viral Video : आजोबा अन् २ नातवांना भरधाव 'थार'ने चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू; थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT