]Male and female passengers visiting the library of 'C2' coach at the railway station. esakal
नाशिक

Panchavati Express Library: पंचवटी एक्स्प्रेस ग्रंथालयात वाढली पुस्तकांची संख्या!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिककरांना ४६ वर्षांहून अधिक वर्षांची सेवा देणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसच्या ‘सी२’ कोचमध्ये सध्या पुस्तकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आहे.

महाराष्ट्रातला पहिला प्रयोग असणारे ‘सी२’ कोचमधील ग्रंथालयात दानशूर वाचक पुस्तके भेट द्यायला लागल्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसचे हे वेगळे वैशिष्ट्य सध्या महाराष्ट्रभर चर्चिले जात आहे. (Number of books increased in Panchavati Express Library nashik)

प्रवास करताना विरंगुळा म्हणून सध्या नागरिक मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे कान व डोळे यांना हळूहळू इजा होते. शिवाय ध्वनिप्रदूषण वाढते.

त्यामुळे ‘सी२’ कोचमधील दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासी चाकरमानी आणि व्यावसायिकांनी येथे एक नवीन ग्रंथालय स्थापन केले असून, या ग्रंथालयात पुस्तकांची संख्या अडीचशेहून अधिक झाली आहे.

विविध विषयांवरची पुस्तके प्रवासी रोज नाशिक रोडला बसल्यावर या ग्रंथालयातून घेतात आणि कसारा-ठाणे-सीएसटीपर्यंत पुस्तक वाचतात. ही वाचन चळवळ वृद्धिंगत होण्याबरोबरच प्रवाशांच्या ज्ञानात भर पडते आहे.

शिवाय नवीन पुस्तक वाचायला मिळतात. वाचकांमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पंचवटी ‘सी२’ कोचमधील हे ग्रंथालय सध्या पंचवटीत प्रवास करणाऱ्या वाचकांचे माहेरघर झाले आहे.

"दानशूर वाचक आणि प्रवासी स्वखर्चाने पुस्तके खरेदी करून या ग्रंथालयात आणून ठेवत आहेत. या मागचा उद्देश पुस्तकांची गोडी लागून वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी हा असला तरी सध्याच्या डिजिटल जमान्यात प्रवासी पुस्तकांच्या सहवासात राहिले पाहिजे आणि ज्ञानरूपी झाली पाहिजे म्हणून हा अनोखा उपक्रम सध्या हायटेक होत आहे."

- गुरमितसिंग रावल, रेल परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT