Changed new look of railway station. esakal
नाशिक

Nashik Railway Station : रेल्वेस्थानकावर ‘CCTV’ची संख्या वाढणार

नाशिक रोड रेल्वेस्थानकात सध्या नवीन हायटेक सेवा देण्यासाठी बदल सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Railway Station : नाशिक रोड रेल्वेस्थानकात सध्या नवीन हायटेक सेवा देण्यासाठी बदल सुरू आहेत. त्यामुळे सीसीटीव्हीची संख्या वाढवणार असल्याचे स्टेशन मास्तर मनोजकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

गुन्हेगारीला आळा बसावा आणि सुरक्षेचा उपाय म्हणून कॅमेऱ्याची संख्या वाढवणार आहे. (number of CCTV will increase at nashik road railway station nashik news)

शंभरहून अधिक सीसीटीव्ही येणाऱ्या महिनाभरात कार्यरत होऊ शकतात. त्यामुळे आवश्यकता असेल तेथे सीसीटीव्हीची संख्या वाढवली जाणार आहे सीसीटीव्हीची क्षमता वाढवण्याचा विचार असल्याचे मनोजकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. सध्या फलाट क्रमांक चार येथे काही गाड्या थांबत असल्यामुळे कार्यरत आहे. त्यामुळे या ठिकाणी कॅमेऱ्याची संख्या वाढवणार आहे.

रेल्वे स्थानकाला सध्या नवीन लुक दिला जात आहे. या ठिकाणी असणारी प्रीमिअम पार्किंग बंद करून या ठिकाणी फुटपाथ बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे येणारा कुंभमेळा आणि सुरक्षेच्या उपाययोजना ग्राह्य धरून सीसीटीव्हीची क्षमता आणि संख्या वाढवणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

''सध्या प्रवाशांना हायटेक सेवा मिळाव्यात म्हणून फलाट दोन आणि तीन स्मार्ट करण्याचे काम सुरू आहे. यातच आता सीसीटीव्हीची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. संभाव्य गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या वाढवणार आहे.''- मनोजकुमार श्रीवास्तव, स्टेशन मास्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT