The number of patients in the district has doubled in 23 days nashik marathi news 
नाशिक

जिल्ह्यात २३ दिवसात रुग्णसंख्या होतेय दुप्पट; तर कोरोनाचे ४ हजार ९३४ ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण

अरुण मलाणी

नाशिक :  गेल्‍या १ ऑगस्‍टला जिल्‍ह्‍यातील कोरोना रूग्‍णांची संख्या पंधरा हजार झालेली असतांना, वीस हजारांचा टप्पा गाठेपर्यंत डबलींग रेट सरासरी सोळा ते वीस दिवसांचा होता. सध्या जिल्‍ह्‍यात रूग्‍ण संख्या वाढत असली तरी डबलींग रेट तेवीस दिवसांचा झाला आहे.

रविवारी (ता.२३) दिवसभरात ६७४ कोरोना बाधित आढळल्‍याने एकूण बाधितांचा आकडा ३० हजार ००९ झाला आहे. ५३० रूग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या २४ हजार ३०७ झाली आहे. ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णांच्‍या संख्येत १४४ ने वाढ झाली असून सध्या ४ हजार ९३४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सात मृत्‍यू झाल्‍याने मृतांचा आकडा ७६८ झाला आहे. 

डबलींग रेट तेवीस दिवसांचा

जिल्‍ह्‍यात पहिला रूग्‍ण आढळल्‍यानंतर एक हजार रूग्‍ण संख्या २६ मेस झाली होती. यानंतर १५ जूनला दोन हजार रूग्‍ण झाले होते. ४ जुलैला ५ हजारांचा, तर २१ जुलैला दहा हजार रूग्‍ण संख्येचा टप्पा गाठला होता. १ ऑगस्‍टला रूग्‍ण संख्येने पंधरा हजारांचा आकडा ओलांडला होता. तीस हजार रूग्‍ण संख्या रविवारी झाली असल्‍याने रूग्‍ण संख्येचा डबलींग रेट तेवीस दिवसांचा झाला आहे. या गतीने रूग्‍ण संख्या वाढत राहिल्‍यास सप्‍टेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांचा आकडा चाळीस हजार पार जाण्याची शक्‍यता आहे.

६७४ कोरोनाचे रूग्‍ण 

दिवसभरात नाशिक शहरातील ३६२, नाशिक ग्रामीणचे २४६, मालेगावचे ६५ तर जिल्‍हाबाह्य एक कोरोना बाधित असे ६७४ कोरोनाचे रूग्‍ण आढळून आले आहेत. बरे झालेल्‍या ५३० रूग्‍णांमध्ये नाशिक ग्रामीणचे २७३, नाशिक शहरातील २३८, मालेगाव १८ तर जिल्‍हाबाह्य एका रूग्‍णाने कोरोनावर मात केली आहे. मृत्‍यू झालेल्‍या सात रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील तीन, ग्रामीणचे दोन, मालेगाव महापालिका हद्दीतील दोन रूग्‍णांचा समावेश आहे. 

नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५६८, ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १८४, मालेगाव महापालिका व गृहविलगीकरणात ४६, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २४, जिल्‍हा रूग्‍णालयात दहा संशयित दाखल केले आहेत. ८९० संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Success Story: मित्रांची साथ ठरली निर्णायक… सर्व रूममेट बनले अधिकारी… सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड

Latest Marathi News Live Update : मुंबईतील सत्याच्या मोर्चाच्या ठिकाणी महाआघाडीतील नेते उपस्थित

Kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेत नकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी घेतलं चांगलचं फैलावर, आयुक्तांनाही सुनावत आबिटकर म्हणाले...

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? तब्बल इतक्या कोटींचं आहे बजेट

श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?

SCROLL FOR NEXT