नाशिक

सासरच्या त्रासाला कंटाळून नर्सची आत्महत्या

CD
सासरच्या जाचाला कंटाळून परिचारिकेची आत्महत्या पतीला अटक; सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : फ्लॅट स्वतःच्या भावाच्या नावावर करून देण्यासाठी आणि चारित्र्याचा संशय घेऊन सतत शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अखेर परिचारिकेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. औषधोपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासरे, दीर व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पतीला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यास शुक्रवार (ता. ९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दीपाली अनिल पवार (वय ३५, रा. क्लासिक निकेतन अपार्टमेंट, महात्मानगर, नाशिक) असे मृत परिचारिकेचे नाव आहे. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात लिपिक असलेला संशयित पती अनिल पवार यास अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयाने शुक्रवार (ता. ९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी तिचे वडील सयाजी रामदास गायकवाड (वय ६६, रा. त्र्यंबकेश्वर) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत दीपाली जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. २०१४ मध्ये अनिलशी त्यांचा विवाह झाला होता. दीपाली यांनी स्वतःच्या नावाने अहिल्यानगर येथे एक फ्लॅट घेतला होता. हा फ्लॅट पती अनिल हा त्याचा भाऊ सुनील पवार याच्या नावावर करून देण्यासाठी सतत दबाव आणत होता. या कारणावरून सासू, सासरे, दीर आणि नणंद फोनवरून तिला शिवीगाळ व दमदाटी करीत होते. संशयित पती अनिल पवार याने दीपालीच्या पगाराचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून पैसे परस्पर स्वतःच्या पालकांना पाठवत होता. मुलगा शाळेत जाऊ लागल्यानंतर खर्चासाठी दीपालीने एटीएम कार्ड परत मागितले असता, त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत त्रास देणे सुरू केले. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना फोन करणे, मुलांसमोर मारहाण करणे आणि मानसिक छळ करणे असे प्रकार सतत सुरू होते. या त्रासाला कंटाळून दीपालीने न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराविरोधात अर्जही दाखल केला होता. रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून पळ गेल्या रविवारी (ता. ४) सकाळी दहाच्या सुमारास संशयिताने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली. या त्रासाला कंटाळून तिने धान्यात टाकण्याची विषारी पावडर प्राशन केल्याने प्रकृती बिघडल्यानंतर तिने स्वतः गाडी चालवून खासगी रुग्णालय गाठले. तेथे डॉक्टरांनी पती अनिल याला बोलावून अनामत रक्कम भरण्यास सांगितले असता, त्याने पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून तो निघून गेला. दीपालीच्या माहेरच्यांनी तिला तत्काळ अपोलो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान साेमवारी (ता. ५) तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा या प्रकरणी सातपूर पोलिसांनी मृत दीपालीचे पती अनिल पवार, सुशीला पवार (सासू), सोन्याबापू पवार (सासरे), सुनील पवार (दीर), सुवर्णा पवार (दिराणी), रेखा धोत्रे (नणंद) आणि किशोर धोत्रे (नंदोई, सर्व रा. घारगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक राहुल नळकांडे तपास करीत आहेत. फोटो : मृत दीपाली पवार H31495 संशयित पती अनिल पवार H31496

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT