SHC26B13618
खर्दे (ता. शिरपूर) : नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत मेळाव्याचे उद्घाटन करताना आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, भूपेशभाई पटेल, जयश्रीबेन पटेल, कृतीबेन पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल आदी.
------
नर्सिंग हे ईश्वरीय सेवेचे माध्यम
आमदार अमरीशभाई पटेल : देसाई नर्सिंग महाविद्यालयात नवप्रवेशितांचे समारंभपूर्वक स्वागत
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ९ : रंजल्या- गांजलेल्यांची सेवा ही देवाची सेवा असल्याचे आपल्या संस्कृतीत नमूद आहे. वेदनेने पीडीत असलेल्या रुग्णांची देखभाल, सुश्रूषा करण्याची परंपरा असलेले वैद्यकीय क्षेत्र सर्वार्थाने श्रेष्ठ आहे. त्यात परिचारिकांचा सिंहाचा वाटा असून, नर्सिंग हे ईश्वरीय सेवेचे माध्यम समजून कर्तव्य बजवावे, असे आवाहन एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले.
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित खर्दे बुद्रूक (ता. शिरपूर) श्रीमती अलका देसाई कॉलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड रिसर्च सेंटरमध्ये नव प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत मेळावा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, एसव्हीकेएम कार्यकारिणी सदस्या श्रीमती केतकीबेन पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या विश्वस्त कृतिबेन पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, श्रीमती अलकाबेन देसाई तथा कक्कूबेन पटेल, हिरलबेन पटेल, प्रथ पटेल, तथ्य पटेल, गोपाल भंडारी, राजेश मुनोत, डॉ. संतोष पवार, श्रीमती ओबेरॉय, प्राचार्या डॉ. सुभाषिनी उपस्थित होते.
आमदार पटेल म्हणाले, आदिवासीबहुल भागातील युवक- युवतींना नर्सिंग क्षेत्रात करिअरची मोठी संधी आहे. त्यांच्यामधील उपजत सेवाभावाला नर्सिंगच्या ज्ञानाची जोड मिळाल्यास समाजाला खूप मोठा फायदा होईल. आमदार पावरा यांनी आदिवासी मुली मोठ्या संख्येने नर्सिंग शाखेकडे वळत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. भूपेशभाई पटेल म्हणाले, नर्सिंग हा केवळ व्यवसाय नसून रुग्णांच्या वेदना समजून घेऊन त्यांना आधार देण्याचे पवित्र कार्य आहे. डॉ. सुभाषिनी यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि नर्सिंग शिक्षणातील विविध संधींची माहिती देऊन नवप्रवेशितांचे स्वागत केले. राजेश मुनोत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.