While distributing nutritional food to tuberculosis patients through Jagdish Patil, Dr. Kalpana Kute, Bhagwan Bhagat, Ajay Kor, Nilesh Pawar, Prakash Gangurde, Mahesh Sanade, Krishna Shelar, Bhushan Kute etc.
While distributing nutritional food to tuberculosis patients through Jagdish Patil, Dr. Kalpana Kute, Bhagwan Bhagat, Ajay Kor, Nilesh Pawar, Prakash Gangurde, Mahesh Sanade, Krishna Shelar, Bhushan Kute etc. esakal
नाशिक

Tuberculosis Nutrition Diet : ‘निक्षय मित्र’ कडून क्षयरुग्णांना पोषण आहार

विक्रांत मते

नाशिक : प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत ‘निक्षय मित्र’ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्याकडून २० क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी ज्या संस्था, व्यक्ती पुढे येतात आणि साहाय्य करतात त्यांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. (Nutritional diet for tuberculosis patients from Nikshaya Mitra nashik news)

महापालिकेच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते, संस्था, औद्योगिक संस्था, संघटनांची बैठक घेऊन क्षयरुणांना पोषण आहार देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने पाटील यांनी प्रभाग चारमधील क्षयरुणांना पोषण आहार देण्याची तयारी दर्शविली होती.

त्यानुसार गुरुवारी (ता. २५) प्रभाग चार व मायको पंचवटी रुग्णालयात क्षयरोगाचे उपचार घेणाऱ्या २० रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. महापालिकेचे आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला.

पाटील यांच्याकडून सामाजिक बांधिलकी आणि क्षयरोगमुक्त भारत अभियानास साहाय्य म्हणून पुढील ६ महिने २० क्षयरुग्णांना पोषण आहार पुरविला जाणार आहे. उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांसाठी उपचारासोबत पोषण आहार अतिशय महत्त्वाचा आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

त्यामुळे रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते व रुग्ण लवकर बरा होतो, असे मार्गदर्शन शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी केले. अधिकाधिक क्षयरुणांना पोषण आहार मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत विभागातील समन्वयक भगवान भगत यांनी केले. या वेळी अजय कोर, नीलेश पवार, प्रकाश गांगुर्डे, महेश सनदे, कृष्णा शेलार, भूषण कुटे, सचिन कदम, सचिन केदार, पप्पू शिंदे यांच्या हस्ते पोषण आहार बास्केटचे वाटप झाले. क्षयरोग विभाग पर्यवेक्षक तुषार जावळे, विवेक जोपळे, चंद्रशेखर राऊत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT