न्याहाळोदला पोलिस पाटील नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
तंटे मिटविण्यात अडचणी; सोनगीर पोलिस ठाण्याचा घ्यावा लागतो आधार
सकाळ वृत्तसेवा
न्याहाळोद (ता. धुळे), ता. १ : गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच ग्रामस्थांमधील छोटे- मोठे वाद गावपातळीवरच सामोपचाराने मिटविण्यासाठी पोलिस पाटील हे महत्त्वाचे पद मानले जाते. मात्र, न्याहाळोद येथे पोलिस पाटील पद रिक्त असल्याने गावातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात एखादा वाद किंवा तंटा निर्माण झाल्यास तो मिटविण्यासाठी ग्रामस्थांना थेट सोनगीर पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे. त्यातच तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची उपलब्धता आणि समितीच्या सध्याच्या कार्यकारिणीबाबतही ग्रामस्थांमध्ये संभ्रम असल्याने गावातील तंटे मिटविण्याची यंत्रणा नेमकी कार्यरत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
न्याहाळोद हे धुळे तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून गावाची लोकसंख्या पंधरा हजाराच्या वरती असून, लागूनच कौठळ, तामसवाडी, हेंकडवाडी, विश्वनाथ, सुकवड, मोहाडी जापी, शिरढाने, बिलाडी विविध गावे आहेत. भौगोलिक विस्तार लक्षात घेता येथे स्थानिक पातळीवर सक्षम पोलिस यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील दोन व्यक्ती, कुटुंबे किंवा शेतजमिनीच्या हद्दीवरून वाद निर्माण झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच मध्यस्थी करून वाद मिटविणे गरजेचे असते. मात्र, पोलिस पाटील पद रिक्त असल्याने अशा परिस्थितीत ग्रामस्थांसमोर अडचणी निर्माण होतात.
तंटामुक्त समितीच्या कार्याबाबत संभ्रम
गावातील तंटे गावातच मिटावेत, न्यायालयीन आणि पोलिस प्रक्रियेवरील अनावश्यक ताण कमी व्हावा, या उद्देशाने तंटामुक्त गाव समितीची संकल्पना राबविण्यात आली आहे. मात्र, न्याहाळोद येथील तंटामुक्त समितीची सध्याची कार्यकारिणी गठित झाली आहे किंवा नाही, अध्यक्ष मात्र आहेत, समितीच्या माध्यमातून प्रत्यक्षात किती तंटे मिटविण्यात आले, याबाबत ग्रामस्थांमध्ये स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.