नाशिक

न्याहारखेडे खुर्द येथे दोन ठिकाणी घरफोडया ;

CD
फोटो-02394 न्याहारखेडे ः गोरख देवरे यांच्या घरातील अस्ताव्यस्त केलेले सामान. न्याहारखेडे खुर्दला एकाच रात्रीत तीन चोऱ्या दागिने, रोकडसह लाखोंचा मुद्देमाल लंपास सकाळ वृत्तसेवा नगरसूल, ता. ११ : न्याहारखेडे खुर्द येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडविल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. न्याहारखेडे खुर्द येथील अंगुलगाव रोड परिसरात गोरख देवरे यांच्या घरी गुरुवारी (ता. ८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरी झाली. देवरे कुटुंबीय झोपलेल्या खोलीच्या दरवाजाला चोरट्यांनी बाहेरून कडी लावून दुसऱ्या खोलीचा दरवाजा तोडून घरातील दागिने, रोकड व मोबाईल लांबविला. यात सात ग्रॅमचे सोन्याचे झुबे, दोन तोळ्यांची सोन्याची पोत, २५ हजारांची रोकड, मोबाईल असा ऐवज चोरीला गेला. दुसऱ्या घटनेत कोळम रोड परिसरातील वयोवृद्ध ठकूबाई भगत घरात झोपलेल्या असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत ओरबाडली. तिसऱ्या घटनेत न्याहारखेडे येथील शेतकरी कैलास देवरे यांच्या शेतातील कांदा चाळीत वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय मजुरांनी चार्जिंगसाठी लावलेले पाच मोबाईल चोरट्यांनी लांबविले. या घटनेत मजुरांचे ७० हजारांचे नुकसान झाले. एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने न्याहारखेडे खुर्द व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT