नाशिक

जिल्हाधिकारी निवासस्थान आवारातील अडकलेल्या पक्षाची सुटका

CD
फोटो : A15001 नाशिक : जिल्हाधिकारी निवासस्थान आवारातील नायलॉन मांजाच्या फासातून पक्ष्याची अग्निशमन पथकाकडून करण्यात आलेली सुटका -- नायलॉन मांजात अडकलेल्या पक्ष्याला जीवदान सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १२ : जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारातील लिंबाच्या झाडावर नायलॉन मांजात अडकलेल्या ‘ग्रेटर कुकल’ पक्ष्याची अग्निशमन दलाच्या पथकाने यशस्वी सुटका केली. जखमी पक्षाला पुढील उपचारासाठी पक्षिमित्राच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी साडेनऊच्या सुमारास हा पक्षी मांजात अडकून फडफडत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळवले. मुख्यालयाचे लीडिंग फायरमन यू. डी. शिर्के, एन. पी. म्हस्के आणि फायरमन एस. पी. देटके, अक्षय गांगुर्डे, प्रशांत इंदरखे यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर पक्ष्याची सुखरूप सुटका केली. शहरात दररोज नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे किंवा मृत्युमुखी पडण्याचे प्रकार घडत आहेत. वेळेवर माहिती मिळाल्यास अग्निशमन दल त्यांना जीवनदान देते, मात्र अनेक ठिकाणी माहिती न मिळाल्याने पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. आगामी संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मनुष्य व पक्ष्यांची जीवितहानी टाळण्यासाठी नायलॉन मांजावर कठोर बंदी घालावी आणि केवळ पारंपरिक सुती मांजाच्या वापरास परवानगी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT