nylon manja stock esakal
नाशिक

Nashik Crime News : त्रिमुर्तीत सव्वालाख नायलॉनचा मांजा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : अंबड पोलिसांनी त्रिमूर्ती चौक येथील सम्राट पतंग विक्री केंद्रावर तपासणी केली असता येथे एक लाख चार हजार आठशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. (nylon Manja stock of 1 lakh worth seized in Trimurti Nashik Crime News)

१५ दिवसांवर संक्रांत हा सण येऊ घातला आहे. या काळात मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात. परंतु पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे लक्षात घेऊन अंबड पोलिसांनी संपूर्ण नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे.

या अनुषंगाने आज (ता.२४) पोलिस विभागाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत संशयित अजिंक्य प्रदीप भिसे (त्रिमूर्ती चौक) व बाळासाहेब खंडेराव राहींज (जेलरोड) यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई पोलिस शिपाई प्रशांत नागरे, मुकेश गांगुर्डे, योगेश शिरसाट, प्रवीण राठोड, तुषार देसले, चालक सोनवणे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

BEST Recruitment: बेस्टमध्ये भरतीचा 'फेक मेसेज', मुख्यालयात बेरोजगारांच्या रांगा; प्रशासनाची तारांबळ

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

IND A vs AFG A: भारतीय संघ तीनशे पार... वैभव सूर्यवंशीच्या अपयशानंतरही इतरांनी अफगाणिस्तानला झोडले

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

SCROLL FOR NEXT