10000 rs fine to coule obstructed government work esakal
नाशिक

सरकारी कामात अडथळा; दाम्पत्याला 10 हजाराचा दंड

नरेश हाळणोर

नाशिक : आठ वर्षांपूर्वी गंगापूर रोड परिसरातील विधानसभा निवडणुकीदरम्यान (Legislative election) मतदान केंद्रानजीक प्रतिबंधित क्षेत्रात वाहन नेण्यावरून दाम्पत्याने बंदोबस्तावरील पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच, महिलेने पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी दाम्पत्याविरुद्ध गंगापूर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सदर घटना १५ ऑक्टोबर २०१४ ला घडली होती. (Obstruction of government work couple was fined Rs 10000 Nashik News)

याप्रकरणी न्यायालयाने दांपत्यास चांगल्या वर्तणुकीचे वर्षभरासाठी बंधपत्र व प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रूपाली दीपक अंजने, दीपक मंगलदास अंजने (दोन्ही रा. उदयनगर, गंगापूर रोड), अशी आरोपींची नावे आहेत. गंगापूर पोलिस ठाण्याच्या तत्कालीन उपनिरीक्षक सरिता जाधव यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर रोडवरील वाघ गुरुजी शाळेच्या मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत होत्या. या वेळी दुचाकीवरून आरोपी अंजने दांपत्य आले व त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात दुचाकी नेली. पोलिसांनी त्यांना तसे न करण्यास बजावले. मात्र, अंजने दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली, तसेच कराटे चॅम्पियन असल्याचे म्हणत आरोपी रूपाली हिने सरीता जाधव यांना मारहाण केली.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. योगेश कापसे यांनी कामकाज पाहिले. न्यायाधीश आर. आर. राठी यांनी दोघांना प्रत्येकी १० हजारांचा दंड आणि वर्षभरासाठी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र देण्याचे आदेश बजावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅस सिलिंडरच्या बहाण्याने तरुणीला शेतात नेलं; सामूहिक अत्याचारानंतर अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, दोघांना अटक

Career Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांना कोणत्याही कामात येतात शंभर अडथळे, पण जिद्दीने पूर्ण करतात सगळी स्वप्नं

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये CNG टंचाईचा फटका! टँकर चालकांच्या संपामुळे पर्यटकांची गैरसोय

Mumbai: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! २,६५७ प्रवाशांवर कारवाईचा बडगा, ५ लाखांची वसुली

Vijay Thalapathy: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय थलापती यांच्या मोठ्या घोषणा; 'या' फाईलवर केली पहिली सही

SCROLL FOR NEXT