wani gad esakal
नाशिक

नवरात्रोत्सवानिमित्त नांदुरी गडावर रविवारपासून खासगी वाहनांना ‘No Entry’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदुरी गडावर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने आणि कोजागरी पोर्णिमानिमित्त या दरम्यानच्या काळात वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून परिवहन महामंडळाच्या गाड्याशिवाय इतर खासगी दुचाकी व चारचाकी वाहने यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय अपर जिल्हादंडाधिकारी यांनी घेतला आहे. (occasion of Navratri festival 2022 No Entry for private vehicles at Nanduri gad from Sunday Nashik Latest Marathi News)

सोमवारपासून नवरात्रोत्सवास सुरवात होत आहे. यावेळी जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गड येथे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दरम्यानच्या काळात देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहे. यातच गडावर जाणारा रस्ता हा घाटातून, वळणा-वळणाचा आणि अरुंद असल्याने याठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होण्याची शक्यता आहे.

यामुळे नवरात्रोत्सवात याठिकाणी अपघात होवुन भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होवू शकतो. तसेच अशीच परिस्थिती ही कोजागरी पोर्णिमानिमित्त होण्याची शक्यता असल्याने मुंबई मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अन्वये २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर आणि ८ ते ९ ऑक्टोबर दरम्यान नांदुरी ते श्री सप्तशृंग गडावर जाणाऱ्या सर्व प्रकारचे दुचाकी व चारचाकी वाहनांना सप्तशृंग गडावर जाण्यास प्रवेश नाकारला जाणार आहे.

सदरचे निर्बंध हे परिस्थिती नुसार शिथिल करण्याचा व अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारे कायदेशीर कारवाईस पात्र राहतील. नांदुरी ते श्री सप्तशृंग गड येथे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांनाच गडावर जाण्यास परवानगी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT