नाशिक

मालेगावात उकाड्याने नागरिक हैराण, पारा ३७ अंश सेल्सिअसवर

CD
मालेगावात ऑक्टोबर हिटचा तडाखा कमाल तापमान ३८.४ अंशांवर; पहिल्या आठवड्यातील उच्चांकी नोंद सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता.५ : शहर व तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने उकाडा वाढला आहे. ऑक्टोबर हिटचा तडाखा मालेगावकरांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. उन्हाळ्यासारखे चटके बसत असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात सलग दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांवर गेला आहे. सोमवारी (ता. ५) येथे ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या दशकात प्रथमच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान ३८ अंशांवर गेले आहे. पावसाअभावी खरीप पीक वाया गेले असून, शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. पावसाने दडी मारल्याने नदी, नाले, तलाव, पाझर तलाव, विहीर, कूपनलिका कोरडेठाक पडले आहेत. जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हवेतील आर्द्रता कमी होऊन उन्हाचा तडाखा वाढत आहे. ऑक्टोबर उजाडताच कमाल तापमानात माेठ्या प्रमाणावर वाढ झाली. येथे सलग दोन दिवसांपासून पारा ३८ अंशापेक्षा अधिक आहे. रविवारी (ता. ४) पारा ३८.२, तर सोमवारी (ता. ५) ३८.४ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. आठवड्यात किमान तापमान देखील २२ ते २३ अंशांदरम्यान राहत असल्याने रात्रीचा उकाडा देखील वाढला आहे. कडक उन्हामुळे जनजीवन प्रभावित होऊ लागले आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी पाऊस येत नसल्याने उकाडा वाढला आहे. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झाले आहेत. --- ऑक्टोबर हिटची प्रमुख कारणे - पावसाचे प्रमाण कमी होणे व मॉन्सून माघारी जाणे - आकाश निरभ्र झाल्यामुळे सूर्याची किरणे अधिक तीव्रतेने जमिनीवर पडणे - कोरड्या हवेचा प्रभाव वाढणे - वातावरणात उरलेला ओलावा आणि दमटपणामुळे उकाडा अधिक जाणवणे - तापमान सरासरीपेक्षा काही अंशांनी वाढणे --- नागरिकांनी ही घ्यावी काळजी - दिवसा ११ ते ४, या वेळेत अनावश्यक उन्हात जाणे टाळा - भरपूर पाणी आणि आवश्यक असल्यास इलेक्ट्रोलाइट्स घ्या - हलके, सैल व सुती कपडे वापरा - डोकेदुखी, चक्कर, अशक्तपणा किंवा मळमळ जाणवल्यास थंड जागी जा - लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या --- पाच दिवसांचे कमाल तापमान २८ सप्टेंबर - ३७.२ २९ सप्टेंबर - ३७.४ ३० सप्टेंबर - ३७.४ १ ऑक्टोबर - ३७.२ २ ऑक्टोबर - ३७.२ ३ ऑक्टोबर - ३७.४ ४ ऑक्टोबर - ३८.२ ५ ऑक्टोबर - ३८.४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT