नाशिक

ऑक्टोबर ''हिट''मा रोपं चालनात जळी; मिरचीना फुलं भी राहिनात गळी

CD
फोटो ओळी- 03367, 03368 अभोणा : वाढत्या उष्णतेमुळे परिसरातील कांदा व टोमॅटो पिकावर रोगाचा झालेला प्रादुर्भाव. अभोणा परिसरात पिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा सकाळ वृत्तसेवा अभोणा, ता. ९ : दोन आठवड्यांपासून ‘ऑक्टोबर हिट’च्या वाढत्या तडाख्यामुळे परिसरातील कांद्याची रोपे, मिरची, टोमॅटो, हळद, आद्रक, स्ट्राबेरी, शिमला मिरची व कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. वातावरणातील दिवसरात्रीच्या बदलामुळे रात्री थंडी, पहाटेची दव व दिवसा प्रखर उष्णता याचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. गेल्या महिन्यात टाकलेली कांद्याची रोपे, मिरची, टोमॅटो तसेच लागवड झालेल्या कांद्यावर वाढत्या उष्णतेमुळे जळी पडणे, करपा, मर, कूज, फुलगळ आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मिरची, टोमॅटोची उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ होत आहे. तसेच कांद्याची रोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त फवारण्या घ्याव्या लागत असल्याने आर्थिक बजेटही कोलमडले आहे. ......... कोट शेतकऱ्यांनी दिवसा पिकांना पाणी न देता, सायंकाळी किंवा सकाळी दिवसाआड पाणी द्यावे. ताक व गूळमिश्रित पाणी उष्णता रोखू शकते. सिलिकॉन किंवा सिव्हिडचा वापर वाढवावा. अतिघातक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक टाळावे. -विनोद पाटील, कृषी सल्लागार, दह्याणे (पाळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार; आंतरराष्ट्रीय कायदा अन् मानवाधिकारांसाठी मोठं काम

Gokul Milk Union Election : बंटी पाटलांना शिट्टी, तर महायुतीला कपबशी; गोकुळच्या रणधुमाळीला वेग, ५ हजार ३०० ठरावधारकांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी धावपळ

Family Pension Rules: सुनेच्या पेन्शनमध्ये सासूला हिस्सा मिळतो का? नातवंडांकडून पैसे मागता येतात? हायकोर्टाने काय सांगितलं?

जसप्रीत बुमराह RCB मध्ये? MI च्या माजी खेळाडूचा गौप्यस्फोट, तेव्हा IPL फ्रँचायझी म्हणाली, 'ये बुमराह-वुमराह क्या करेगा?'

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT