(तापमानाचे चित्र वापरावे)
‘ऑक्टोबर हिट’चा चटका;
दशकातील सर्वाधिक तापमान
(उपशीर्षक)
पारा ३८ अंशांपर्यंत; शहरात उन्हाचा कडाका कायम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : पावसाळा संपल्यानंतर वातावरणात गारवा जाणवण्याची अपेक्षा असताना यंदा कमी पावसामुळे ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढलेला आहे. जळगावमध्ये सध्या कमाल तापमान वाढलेले असून सध्या ३८ अंशांपर्यंत पोहोचलेला आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार गेल्या दशकात ऑक्टोबरमध्ये यंदा उच्चांक तापमानाची नोंद झाली आहे.
मॉन्सून माघारी गेल्यानंतर आणि यंदाच्या ''एल निनो''च्या प्रभावामुळे हवामानावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण राहिले आहे. जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पावसाचे कमी राहिले आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून तापमान वाढले आहे. सद्यस्थितीला जळगावात ऑक्टोबर हिटचा तडाखा अधिक जाणवत असून मागील दहा वर्षांचा विचार केल्यास यंदा ऑक्टोबरमध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.
सकाळी तुलनेने दिलासा
दिवसा तापमान वाढत असल्याने दुपारच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अधिक चटका जाणवत आहे. शिवाय, उकाडा देखील अधिक जाणवत आहे. या उलट सकाळी आणि रात्री तुलनेने दिलासा मिळत असला, तरी दुपारच्या उष्णतेमुळे वातावरणातील अस्वस्थता कायम आहे.
चौकट
२०१५ मध्ये पारा ३८ अंशांवर
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात २०१५ मध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यानंतर २०१८ मध्ये ३७.९ अंश, तर २०१७ आणि २०२३ मध्येही ऑक्टोबरमधील कमाल तापमान ३७.२ अंशांपर्यंत पोहोचले होते. परंतु, मागील काही वर्षात ऑक्टोबरमध्ये थंडी जाणवत होती. यामुळे ऑक्टोबरमधील तापमान अधिक वाढलेले नव्हते. यंदा मात्र तापमानात वाढ झाली असून ऑक्टोबरमध्ये जळगावमध्ये उन्हाचा कडाका वाढू शकतो, हे चित्र आहे.
–––––––
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.