नाशिक

‘ऑक्टोबर हिट’चा चटका; पारा ३५ अंशांवर

CD
‘ऑक्टोबर हिट’चा चटका पारा ३५ अंशांवर; दिवसा ऊन, रात्री गारवा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ः परतीच्‍या पावसाने ओढ दिल्‍यानंतर सप्‍टेंबरपासूनच उन्‍हाच्‍या झळा जाणवत होत्‍या. गेल्‍या सहा दिवसांपासून उन्हाच्‍या झळा अधिक तीव्र झाल्‍या असून, शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे. सध्याच्‍या ‘ऑक्टोबर हिट’मुळे दिवसा कडक उन तर रात्री गारवा राहात असताना, किमान-कमाल तापमानात मोठी तफावत निर्माण झाली आहे. गेल्या सहा दिवसांत शहराचे कमाल तापमान सातत्याने ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे. वाढत्या उकाड्याने आणि तीव्र उन्हाने नाशिककर चांगलेच घामाघूम होत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून शहरात कोरडे आणि निरभ्र हवामान पाहायला मिळत आहे. गेल्‍या आठवड्याभराच्‍या तापमानाच्‍या पाऱ्याचा अंदाज घेतला असता, २ ऑक्टोबरला उच्चांकी ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाख्यामुळे जनजीवनावर परिणाम होतो आहे. कमाल तापमानासोबतच हवेतील आद्रतेचे प्रमाण दुपारी ३० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान राहत असल्याने घामाच्या धारा लागून असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. ---------- रात्री गारवा, दुपारी चटका शहरात सध्या विषम हवामान अनुभवायला मिळत आहे. पहाटे, रात्रीच्या वेळी किमान तापमान १७ ते २० अंशांपर्यंत घसरल्याने हलका गारवा जाणवतो. तर दुपारी मात्र तीव्र उन्हाचे चटके बसत आहेत. तापमानातील या मोठ्या तफावतीमुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हापासून संरक्षणासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्राकडून केले आहे. -- गेल्‍या आठवडाभरात नोंदविलेले तापमान तारीख कमाल तापमान किमान तापमान १ ऑक्टोबर ३४.८ २०.५ २ ऑक्टोबर ३५.१ २०.३ ३ ऑक्टोबर ३४.५ १७.४ ४ ऑक्टोबर ३५.० १७.४ ५ ऑक्टोबर ३४.६ १९.५ ६ ऑक्टोबर ३४.८ २०.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT