Offensive video to forensic lab for examination Swami Samarth Kendra Extortion Case nashik news esakal
नाशिक

Swami Samarth Kendra Extortion Case: ‘ते’ आक्षेपार्ह व्हिडिओ तपासणीसाठी ‘फॉरेन्सिक लॅब’कडे; घरातून 19 लाख जप्त

सकाळ वृत्तसेवा

Swami Samarth Kendra Extortion Case: दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राचे विश्वस्तांना आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून खंडणी उकळणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्याच्या घरातून पोलिसांनी आत्तापर्यंत १९ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

तसेच घरझडतीमध्ये जप्त करण्यात आलेले लॅपटॉप व मोबाईलमधील आक्षेपार्ह व्हिडिओची सत्यता पडताळणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेले आहेत.

दरम्यान, पोलिस कोठडीत असलेल्या मायलेकांनी आणखी कोणाला खंडणीसाठी ब्लॅकमेल केले आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहेत. (Offensive video to forensic lab for examination Swami Samarth Kendra Extortion Case nashik news)

दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राचे विश्वस्त निंबा शिरसाट (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी घेताना गंगापूर पोलिस ठाण्याचे पथक व खंडणीविरोधी पथकाने जेहान सर्कल येथे शनिवारी (ता. १८) रात्री संशयित महिला कृषी अधिकारी सारिका सोनवणे (वय ४२), तिचा मुलगा मोहित सोनवणे (२५, रा. सिडको) या दोघांना अटक केली.

संशयित सारिका सोनवणे हिची विश्वस्त शिरसाट यांच्याशी २०१५ पासून ओळख होती. केंद्रात उपासिका असलेल्या सारिका सोनवणे हिच्यावर सिडको व नंतर कसमादे पट्ट्यातील स्वामी समर्थ केंद्राची जबाबदारी देण्यात आली होती. याच दरम्यान तिने उसनवार पैसे घेतले. त्यानंतर तिने शिरसाट यांना आक्षेपार्ह व्हिडिओची धमकी देत वारंवार खंडणी उकळली.

त्यातून आत्तापर्यंत एक कोटी पाच लाख रुपये घेतले होते. गेल्या जानेवारीत तिने २० कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर शिरसाट यांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, गेल्या शनिवारी १० लाख रुपयांची खंडणी घेताना दोघांना अटक करण्यात आली.

घरझडतीतून रोकड जप्त

नाशिक शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने संशयित सारिका सोनवणे हिच्या सिडकोतील घराची झडती घेतली असता, आत्तापर्यंत १९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, लॅपटॉप व मोबाईलही जप्त करण्यात आलेला आहे. यातील आक्षेपार्ह व्हिडिओची सत्यता पडताळणीसाठी ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिससूत्रांनी सांगितले.

मुलास आयटीचे जुजबी ज्ञान

निफाड येथे नियुक्तीस असलेल्या महिला कृषी अधिकारी सारिका सोनवणे हिच्यासमवेत मुलगा मोहित यालाही अटक करण्यात आली आहे. मोहित हा विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. तसेच त्याला आयटी इंजिनिअरिंगचे जुजबी ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्याकडील फोटो वा व्हिडिओ खरे की खोटे, याचा पोलिस आता शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT