Old Age Home esakal
नाशिक

Old Age Home : ज्येष्ठांना आरोग्यापासून मन रिझवण्याचा आधार

दत्ता जाधव

नाशिक : कुटुंबीयांपासून दुरावलेल्यांचा प्रवास गोड अन सुखकर व्हावा म्हणून वृद्धाश्रमांमध्ये काळजी घेतली जाते. एवढेच नव्हे, तर ज्येष्ठांच्या आयुष्यातील सायंकाळ रम्य ठरावी म्हणून आरोग्यापासून मन रिझवण्याचा आधार दिला जातोय. मनोरंजनासह सण-उत्सव साजरे करत सामाजिक संघटनांतर्फे जगण्यासाठीची नवी ऊर्जा दिली जात आहे. (Old Age Home Support for seniors to relax their mind from health nashik News)

पशुसंवर्धन विभागात कार्यरत असलेल्या पतीच्या निधनानंतर पुण्यातील सुमन नाईक (वय ७८) आपल्या पक्षघाताचा त्रास कुटुंबीयांना नको म्हणून दोन वर्षांपासून वृद्धाश्रमात राहातात. इथं भावनिक नात्यांबरोबर आरोग्याबाबत विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे हे वृद्धाश्रम नव्हे तर घरच वाटते, असे त्या सांगत होत्या. भडगाव (जि. जळगाव) येथील लक्ष्मीबाई दुसाने (वय ६२) यांनी एक मुलगी दत्तक घेतली. ती तिच्या व्यवसायात कार्यरत आहे.

सहा वर्षापूर्वी वीज मंडळात काम करणाऱ्या पतीच्या निधनानंतर त्यांनी वृद्धाश्रमाची वाट धरली. वृद्धाश्रमात काळजी घेत जात असल्याने त्या समाधानी आहेत. मालेगावमधील सरला अग्निहोत्री (वय ६०) यांच्या तीनही मुलींचा विवाह झाला आहे. पतींचे मालेगावमध्ये साडीचे दुकान होते. त्यांच्या निधनानंतर त्या सहा वर्षांपासून वृद्धाश्रमात निवासी आहेत. जीवाभावाच्या माणसांसह सुविधा उपलब्ध असल्याने मन रमत असल्याचे त्या सांगत होत्या.

बालपण, तारुण्यातील सुंदर आयुष्य जगल्यावर आयुष्याचा शेवट तसाच गोड व्हावा, अशी अपेक्षा प्रत्येकाने मनोमनी व्यक्त केलेली असते. परंतु पडत्या काळात कोणाच्या वाट्याला काय येईल, हे सांगता येत नाही. घरात ज्येष्ठ व्यक्ती हवी, असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात विविध कारणांनी समाजात ज्येष्ठांची अवहेलना सुरू असल्याचे जळजळीत वास्तव आहे. ‘हम दो-हमारे दो’च्या जमान्यात ज्येष्ठांचे घरातील वास्तव्य अनेकांना त्रासदायक वाटते.

यातून निर्माण होणाऱ्या कलहामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. त्यातील समाजसेवी असलेले अनेक वृद्धाश्रम आजही दानशुरांच्या प्रेरणेने सुरू आहेत, तर काही बंद पडले आहेत. सामनगावच्या वृद्धाश्रमात ६५ ज्येष्ठ वास्तव्यास आहेत. महासती चंदनाजी यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेला हा मातोश्री वृद्धाश्रम लवकर स्वत:च्या वास्तूत जाणार असल्याचे सुनील चोपडा यांनी सांगितले.

चांदशी येथील सहारा केअर सेंटरमध्ये ३० ज्येष्ठांची व्यवस्था करण्यात आली असून यातील काहींची अल्प शुल्कात तर काहींची मोफत व्यवस्था करण्यात आल्याचे संचालक रवींद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या वाढदिवसासह घरगुती वातावरण जपण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी सायंकाळी भजन कीर्तनासह अन्य उपक्रम राबवले जातात.

खासगी केअरटेकरसह नर्सेस उपलब्ध

ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी नर्सेससह केअर टेकर उपलब्ध होतात. त्यामुळे अनेकांनी घरातील ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवण्यापेक्षा घरात केअर टेकरसह नर्सेसची व्यवस्था केली आहे. प्रशिक्षण घेतलेल्या नर्सेसकडून नियमित तपासण्यांसह अन्य काळजी घेतली जाते. त्यामुळे ज्येष्ठांच्या सेवेसाठी अशा नर्सेसची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT