Crime News esakal
नाशिक

Nashik Crime: त्या वृद्धेचा लूटमार करून खून; फॉरेन्सिक अहवालातून निष्पन्न

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : जेल रोड परिसरातील लोखंडे मळ्यातील हनुमंतनगरमध्ये ६० वर्षीय वृद्धेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, शवविच्छेदनानंतर वृद्धेच्या डोक्यात काहीतरी वस्तूने सात ते आठ वेळा डोक्यात मारल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

त्यानुसार, उपनगर पोलिसात अज्ञाताविरुद्ध लुटमारीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी (ता. १८) भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे जेलरोड परिसरात खळबळ उडाली आहे. (old woman robbed and killed From forensic report Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सुरेखा उर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर (६०) असे मयत वृद्धेचे नाव आहे. सुरेखा बेलेकर यांचे सोमवारी (ता. १९) शवविच्छेदन केले असता, फॉरेन्सिक अहवालानुसार त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. बेलेकर यांच्या डोक्यात काहीतरी अवजड वस्तूने सात ते आठ वेळा मारण्यात आले होते.

त्यामुळे गंभीर दुखापत व अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. खून झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांच्या विशेष पथकांनी बेलेकर यांच्या घरी धाव घेत ठशांचे नमुने घेतले. सुरेखा बेलेकर यांच्या अंगावर सोन्याचे दागिने व हातातील बोटात अंगठ्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संशयिताने मागच्या दाराने येत त्यांच्या खून केला आणि त्यांच्या हाताच्या बोटातील तीन पैकी दोन अंगठ्या व अंगावरील दागिने लुटून पोबारा केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे, गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी ठाण मांडून होते. मात्र सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागलेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT