old woman death.jpg 
नाशिक

नियतीची खेळी! जांभूळ खाण्याचा मोह बेतला जीवावर...अन् अवघ्या काही मिनिटांतच

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिडको) रसाळ जांभळांची आजींना पडली भुरळ... जांभळं  घेण्यासाठी म्हणून त्या पुढे सरसावल्या...अन् बस्स...तिथेच आडवा आला काळ अन् घडले असे अघटित काही वेळात घडला हा धक्कादायक प्रकार...

अशी आहे घटना

जांभूळ वेचण्यासाठी गेलेल्या वृद्धेला वीज प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 14) सिडको परिसरात घडली. मूळ शेगावच्या व सध्या शिवशक्ती चौकातील दत्त मंदिराजवळ भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या केशर महादेव तांगडे (वय 62) या जांभळाच्या झाडाखाली जांभूळ वेचण्यासाठी गेल्या असता, जवळच असलेल्या मिनी पिलरवर अडकलेली फांदी काढण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचा हात मिनी पिलरला लागला. आधीच त्यात वीजप्रवाह उतरल्याने त्याचा धक्का लागून त्या जागीच कोसळल्या. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, घटनास्थळी माहिती घेण्याकरिता आलेल्या प्रभाग 26 मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अलका अहिरे यांना परिसरातील महिलावर्गाने घेराव घालून जाब विचारला. 

सिडको परिसरात वारंवार विजेचे शॉक लागून नागरिक मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधी व महावितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त होताना दिसत आहे. याकरिता भूमिगत तारांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी शिवपुरी चौकात आजी, मुलगी व नात वीज वाहिनीचा शॉक लागून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत नोटिसीला केंद्र सरकारचं उत्तर; हायकोर्टानं याचिका काढली निकाली

Nagothane Flyover Cracks : उड्डाणपुलावर 60 दिवसांत चार ते सहा इंच रुंदीच्या 50 मीटर लांबीच्या भेगा, वाहतूक केली बंद

Viral Video : भाजप नेत्याचा भर रस्त्यात फोनवर बोलता बोलता मृत्यू; हार्ट अटॅक येताच खाली कोसळले अन्... CCTV मध्ये कैद थरारक घटना

Latest Marathi News Live Update : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारावर खलबते; डी. के. शिवकुमारांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक

Pune News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! वनजमिनीवरील पिकांची स्वतंत्र नोंद; वनहक्कधारकांना मिळणार सुधारित सातबारा

SCROLL FOR NEXT