Crime esakal
नाशिक

Nashik Crime: वृद्धेची पोत तर युवकाचा मोबाईल हिसकावला; इंदिरानगर, अंबडमधील घटना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : इंदिरानगर व अंबड परिसरात दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याच्या घटना घडल्या. या दोन घटनांमुळे पुन्हा महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. (Old womans chain stolen youths mobile stolen Incident in Indiranagar Ambad Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कमल बाबुराव कांबळे (६८, रा. चेतना नगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या सोमवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजता घराजवळून पायी जात होत्या. त्यावेळी ॲक्टिवा मोपेडवरून आलेल्या संशयित दुचाकीस्वार चोरट्याने वयोवृद्ध कमल यांच्या गळ्यातील ६० हजार रुपयांची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा केला.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक उपनिरीक्षक शेख हे तपास करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत सिडकोतील उषा रुग्णालयासमोरून राहुल अरविंद बेडसे (२६, रा. ता. साक्री, जि. धुळे, सध्या रा. अशोकनगर, सातपूर) हा गेल्या शनिवारी (ता. १५) रात्री पायी जात होता.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने राहुलच्या हातातील ११ हजार रुपयांचा मोबाइल बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी अंबड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक शेख हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT