Om Mahajan 
नाशिक

नाशिकचा युवा सायकलपटू ओमची विश्वविक्रमाला गवसणी!

राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (नाशिक) : अवघ्या अठरा वर्षांच्या नाशिकच्या ओम महाजन या युवा सायकलपटूने लेह ते मनाली हे ४३३ किलोमीटरवर अंतर अवघ्या २७ तास ५५ मिनिटांत पार करून नवीन विश्वविक्रमाची नोंद केली. यापूर्वीचा हा विक्रम सैन्य दलातील नाशिकचेच अधिकारी भरत पन्नू यांच्या नावावर ३३ तासांचा होता. ओम हा जगातील खडतर समजली जाणारी अमेरिकेतील रॅम स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय डॉ. जितेंद्र महाजन यांचा मुलगा असून डॉ. महेंद्र महाजन यांचा पुतण्या आहे. (Om Mahajan of set a world record by crossing the Leh-Manali distance)

गुरुवारी (ता. २२) सकाळी सहाला लेह येथील लेह गेटपासून त्याने सुरवात केली. २४ जुलैला सकाळी नऊ वाजून ५५ मिनिटांनी मनाली येथे तो पोचला. दिवसरात्र सायकलिंग करून त्याने हे अंतर पार पाडले. ओमने या अंतरात टांगलांगला १७ हजार ५८५ फूट उंच, लाचूंगला हा १६ हजार ६१६ फूट, नाकीला हा १५ हजार ५४७ फूट उंच आणि बारलाचा हा १५ हजार ९१९ फूट उंच असे चार पर्वत ओलांडले. सोबत या खडतर प्रवासात नुकताच दहा हजार फूट उंचीवर झालेल्या अटल टनेल पार करत त्याने हा विश्वविक्रम पूर्ण केला. गोठवणाऱ्या थंडीत टोकदार वळणांचे रस्ते आणि एकीकडे हजारो फूट खोल दरी असणाऱ्या रस्त्यांवरून त्याने ही वाटचाल केली. या संपूर्ण कालावधीत त्याने विश्रांतीसाठी अवघा २० मिनिटांचा पॉवर नॅप घेतला. काका डॉ. महेंद्र महाजन, मनोज महाले, बलभीम कांबळे आणि संदीप कुमार क्रू मेंबर होते. मिथेन ठक्कर त्याचे प्रशिक्षक आहेत. हा विक्रम करण्यासाठी त्याला नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, टीम जसपाल, कर्नल भरत पन्नू, कर्नल विशाल अलाहवट, खेमराज ठाकूर यांचे सहकार्य लाभले.

(Om Mahajan of set a world record by crossing the Leh-Manali distance)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT