नाशिक

जिल्हास्तरीय अविष्कार साठी मोठ्या सहभागाची नोंद

CD
(ओमप्रकाश अग्रवाल : NSK26H31338) -------------- उद्योजक अग्रवाल यांचा मान्यवरांच्या हस्ते आज गौरव भाजप नेते विनोद तावडेंसह विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ४ : भाजपचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. ५) अभीष्टचिंतनासह सन्मानपत्र प्रदानाचा मुख्य कार्यक्रम होईल. येथील मुंबई- आग्रा महामार्गावरील टॉपलाइन रिसॉर्टमध्ये सायंकाळी साडेसहाला होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन श्री. ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल अमृतमहोत्सव समिती व शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केले. श्री. अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारपासून दोन दिवस विविध कार्यक्रम होत आहेत. यात रविवारी गोपूजन, दुष्काळग्रस्त ११ शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी मदत म्हणून ११ गायींचे दान, दुष्काळ निधीसाठी अग्रवाल कुटुंबीयांतर्फे ११ लाखांचा धनादेश देण्यासह सायंकाळी वरुणराजाला साकडे घालणारा प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांचा तसेच, बँडचा भजनसंध्येसह भक्तिमय गीतगायनाचा कार्यक्रम झाला. सोमवारी सायंकाळी टॉपलाइन रिसॉर्टमध्ये श्री. अग्रवाल यांच्या अभीष्टचिंतनासह अमृतमहोत्सव समितीतर्फे सन्मानपत्र प्रदान तसेच त्यांच्या सत्काराचा मुख्य कार्यक्रम होईल. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोद तावडे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, सार्वजनिक आरोग्य व ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे आदी प्रमुख पाहुणे असतील. मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती अग्रवाल यांना अमृतमहोत्सव समितीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. कार्यक्रमास आमदार सर्वश्री अमरिशभाई पटेल, मंगेश चव्हाण, नंदकिशोर महाजन, काशीराम पावरा, मंजुळा गावित, अनिल पाटील, राहुल ढिकले, राम भदाणे, राजूमामा भोळे, अमोल जावळे, राजेश पाडवी, दिलीप बोरसे, देवयानी फरांदे, चंद्रकांत रघुवंशी, सीमा हिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT