Swab Tasting esakal
नाशिक

Omicron Variant | नाशिक शहरात ५६० परदेशी नागरिकांचे आगमन

विक्रांत मते

नाशिक : गेल्या दहा दिवसात शहरात ५६० परदेशी नागरिकांचे आगमन झाले असून, त्यातील १४३ नागरिकांपैकी १३३ नागरिकांचे स्वॅब अहवाल महापालिकेला प्राप्त झाले आहे. तपासणीसाठी दिलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने तूर्त शहरात ओमिक्रॉनचा (Omicron) कुठलाच धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, परदेशातून आलेल्या नागरिकांचे विमानतळावरच स्वॅब घेऊन रिपोर्ट दिला जात असल्याने महापालिकेने शहरात येऊन आठ दिवस झालेल्या नागरिकांचेच स्वॅब तपासण्यासाठी घेतले जात आहे.

परदेशातून आलेल्या नागरिकांवर प्रशासनाची बारीक नजर

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा नवा कोरोनाचा (Corona) विषाणू आढळून आला आहे. या विषाणूचे ३२ म्युटेशन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे जगभरात ओमिक्रॉनबाबत सतर्कता बाळगली जात आहे. नाशिकमध्ये परदेशातून येत असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २६ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत आयर्न स्पर्धेसाठी गेलेल्या दोन व त्यांच्या कुटुंबासह वाहनचालक, असे पाच जण परतले. त्यामुळे शहरात ओमिक्रॉनची दहशत निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. परदेशातून आलेल्या नागरिकांवर प्रशासनाची बारीक नजर असून, अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. दरम्यान, शहरात परदेशातून गेल्या चौदा दिवसांत ५६० नागरिकांचे आगमन झाले आहे. त्यातील १४३ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील १३३ अहवाल निगेटिव्ह आले, दहा अहवाल प्रलंबित आहे.


विमानतळावरच तपासणी

दक्षिण आफ्रिकेसह तेरा देशांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या देशांसह परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड ॲन्टिजेन व आरटी-पीसीआर चाचणी विमानतळावरच केली जात आहे. त्यामुळे महापालिका स्तरावर कुठलीही चाचणी केली जात नाही, परंतु सात दिवस क्वारंटाइन करण्यात आल्यानंतर महापालिकेकडून अंतिम चाचणीसाठी स्वॅब घेतले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT