धुळे ः टुडे ३ साठी
--
फोटो क्रमांक ः 31274
--
अकरा शेतकऱ्यांना गोदान, ११ लाखांचा निधी
-
उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल यांचा आजपासून अमृतमहोत्सवी सोहळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, उद्योजक तथा शिक्षण, सहकार, समाजकारण आणि अर्थकारण क्षेत्रातील धुरंधर ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त धुळ्यात रविवारपासून (ता. ४) दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. वाढदिवसानिमित्त कोणतीही आतषबाजी वा औपचारिकता न करता दुष्काळग्रस्त बळीराजाला दिलासा देणारे उपक्रम राबविले जाणार असून, यात वरुणराजाची करुणा भाकण्यासाठी विशेष भजनसंध्येसह ११ शेतकऱ्यांना गोदान आणि शासन निधीसाठी ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे.
-
अमृतमहोत्सव समितीचे प्रमुख आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, की बळीराजावर ओढवलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी यासाठी रविवारी (ता. ४) सायंकाळी साडेसहाला मालेगाव रोडवरील खानदेश गोशाळेच्या मैदानावर भक्तिमय भजनसंध्येचा कार्यक्रम होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार स्मिता वाघ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर मायादेवी परदेशी, आमदार अमरिशभाई पटेल आदींच्या हस्ते गोपूजन होईल.
-
आजपासून कार्यक्रम
मेरा भोला है भंडारी’ फेम गायक हंसराज रघुवंशी यांची भजनसंध्या होईल, तर यानंतर नवी दिल्लीच्या प्रसिद्ध ‘साधो बँड’तर्फे भक्तिमय गीतगायन सादर केले जाईल. सोमवारी (ता. ५) सायंकाळी साडेसहाला मुंबई- आग्रा महामार्गावरील लळिंग टोलनाक्याजवळील टॉपलाइन रिसॉर्टमध्ये ओमप्रकाश अग्रवाल यांचा मुख्य अभीष्टचिंतन सोहळा होईल. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदाममंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी उपस्थित राहतील. सोहळ्यात नेते अग्रवाल यांच्या ७५ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासावर भाष्य करणारी चित्रफीत दाखवली जाईल व मानपत्र प्रदान केले जाईल.
-
बांधिलकीचे दर्शन
समाजोपयोगी उपक्रमांत उपजीविकेसाठी आधार मिळावा म्हणून ११ गरजू शेतकऱ्यांना दुभत्या गायींचे (गोदान) वितरण केले जाईल. शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित मंत्र्यांकडून दुष्काळ राहत निधीसाठी ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला जाईल. शहरातील गरीब वस्त्यांमध्ये धान्य किट्सचे वाटप केले जाईल. कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांनी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न आणता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शालेय मुलांसाठी शैक्षणिक साहित्य भेट द्यावे, असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.