नाशिक

दिशादर्शक व्यक्तिमत्त्व : ओमप्रकाश अग्रवाल

CD
(पासपोर्ट फोटो घेणे) --------------------- दिशादर्शक व्यक्तिमत्त्व : ओमप्रकाशजी अग्रवाल काही माणसे स्वतःसाठी आयुष्य जगतात, तर काही माणसे आपल्या कुटुंबासाठी जगतात. मात्र, अशी काही माणसे असतात, की त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा नकळत अनेकांच्या आयुष्याला दिशा देतो. समुद्रकिनाऱ्यावरचा दीपस्तंभ जसा त्याच्या प्रकाशामुळे अनेक जहाजांना दिशा व मार्ग दाखवतो, तसेच ओमप्रकाशजी पुरणमलजी अग्रवाल उपाख्य ओपी शेट हे असेच एक दीपस्तंभासारखे दिशादर्शक व्यक्तिमत्त्व. ते आज (ता. ४) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्याबद्दल त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा... - प्रतिनिधी, धुळे ---------------- ओपी शेट यांची आजची ओळख यशस्वी उद्योजक अशी असली, तरी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, शिक्षण, सहकार आदी क्षेत्रांशी त्यांची वीण घट्ट जुळली आहे. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकता या गोष्टींचा मेळ जुळवत दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या अंगभूत त्रिगुणांच्या बळावर जनमानसांत कार्याचा अमीट ठसा उमटवला. संघ संस्कार आणि ध्येयवादी जडणघडण आज ओपी शेट यांच्या रूपाने यशस्वी आणि प्रगल्भ नेतृत्वाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र, या यशाची पायाभरणी अत्यंत कठीण परिस्थितीत झाली. त्यांचे पिता (कै.) पुरणमलजी आणि माता (कै.) गीतादेवी अग्रवाल यांनी राजस्थानमधील आपले सिंगनोर गाव सोडून धुळे गाठले तेव्हा त्यांच्यासमोर संघर्षाचा डोंगर होता. सुरवातीला नोकरी आणि नंतर कापड व्यवसायाची उभारणी करताना त्यांच्या वडिलांनी घेतलेले कष्ट ओमप्रकाशजींनी अगदी जवळून पाहिले. वडिलांचे कष्ट आणि आईचे संस्कार हीच ओपी शेट यांच्या आयुष्याची खरी शिदोरी ठरली. धुळे नगरपालिकेच्या शाळेत शिकतानाच, मनोहर चित्रमंदिराशेजारील मोकळ्या पटांगणात भरणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा ओपी शेट यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. मदनलालजी मिश्रा आणि बापट सरांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरले, तर पुढे चालून दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या विचारांना एक निश्चित दिशा मिळाली. संघर्षातून उभारलेले साम्राज्य ओपी शेट यांच्या यशाची पाळेमुळे त्यांच्या जीवनसंघर्षात आहेत. धुळ्यातील विद्यावर्धिनी महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांनी लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत ‘जनरल सेक्रेटरीपद’ पटकावले. हा विजय म्हणजे भविष्यातील एका मोठ्या लोकनेत्याच्या उदयाची नांदी ठरली. ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ धुळ्यास मिळावे म्हणून त्यांनी अनेक आंदोलने उभारली. काँग्रेसच्या राजवटीत धुळ्याची ताकद कमी पडली म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला देण्याचा निर्णय झाला. कारण त्या काळात शिक्षणमंत्री म्हणून शरचंद्रिका अक्का आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हणून मधुकरराव चौधरी यांचा राज्याच्या राजकारणात वरचष्मा होता. तरीही ओमप्रकाशजींच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने धुळे जिल्ह्याला ‘वैद्यकीय महाविद्यालय’ देण्याचा निर्णय घेतला. शिक्षणानंतर व्यवसायाकडे लक्ष शिक्षणानंतर ओमप्रकाशजींनी व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. ओमप्रकाशजींवर भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासह विविध पदांची जबाबदारी आली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, शिवणकर, प्रवीण तोगडिया, पांडुरंग फुंडकर, गोविंदराव चौधरी, डॉ. दौलतराव आहेर, उमा भारती आदी नेत्यांशी त्यांचे संबंध घट्ट झाले. माजी मंत्री दिलवरसिंग पाडवी यांच्याशी तर खास मैत्री होती. ओमप्रकाशजींची राजकारणातील सक्रियता वाढत असताना अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, नरेंद्र मोदी यांच्याशीही ते संपर्कात आले. याच काळात व्यवसायात पुन्हा अपयश आले. परंतु, खचून न जाता १९८९ मध्ये त्यांनी प्रदीर्घ अनुभव, प्रचंड जनसंपर्काच्या बळावर व्यवसाय पुन्हा एकदा भरभराटीला आणला. अनेक उद्योगांची रोवली मुहूर्तमेढ व्यवसाय आणि राजकारणाची सांगड घालत त्यांनी आपले कुटुंबही उत्तमरीत्या सावरले. ओमप्रकाशजींनी अनेकविध व्यवसाय यशस्वीपणे सुरू केले. यामध्ये टॉपलाइन रिसॉर्ट, सोयावडी उत्पादन, अन्नधान्य, तेलबिया, डाळींचे उत्पादन, कोल्ड स्टोअरेज व्यवसाय आदींचा समावेश आहे. पक्षाच्या आदेशानुसार लढविलेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या धर्मपत्नी विमलादेवी दोन वेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या, तर त्यांचे सुपुत्र अनुपभैया अग्रवाल सध्या धुळे शहराचे आमदार आहेत. समाजकार्यातून आदर्शवत काम गरजूंना त्यांच्या पायावर उभे करण्यासह उद्योग-व्यवसाय सुरू करता यावेत म्हणून त्यांनी श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था उभारली. धुळे जिल्हा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष, अग्रवाल संमेलनाचे प्रदेश संघटनमंत्री, अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष, श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्रियदर्शिनी जिमखान्याचे कोशाध्यक्ष, श्री रामकृष्ण सेवा समितीचे विश्वस्त, खानदेश गोशाळेचे सेक्रेटरी आदी विविध संस्था- संघटनांचे ते आजही आश्रयदाते म्हणून कार्यरत आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात श्री रामकृष्ण सेवा समितीच्या माध्यमातून विविध पदांवर काम करताना ओपी शेट यांनी भाविकांसाठी धुळे शहरासह वृंदावन, ऋषिकेश आदी ठिकाणी संतश्री किशोरजी व्यास, श्री डोंगरेजी महाराज, श्री मुरारीजी बापू, भाईश्री रमेशजी ओझा, प्रदीपजी मिश्रा आदी संत- महंतांच्या प्रवचनांसह कथांचे आयोजन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या निःस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘अग्रविभूषण’, ‘अग्रश्री’ आणि ‘खान्देश श्री’ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. उद्योग- समाज- राजकारणाचा त्रिवेणी संगम ओपी शेट यांनी केवळ व्यवसायातच यश मिळवले नाही, तर समाजकारण, धर्मकारण, राजकारण, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रांत कार्याची घट्ट वीण गुंफली. त्यांचे जीवन म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकतेचा उत्तम मेळ आहे. रामकृष्ण सेवा समितीच्या माध्यमातून वडिलांनी सुरू केलेल्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला. --------- चौकट करावी... अजातशत्रू व्यक्तिमत्त्व धावपळीच्या व व्यस्त जीवनातही आरोग्याचे सातत्य टिकविण्यासाठी आजही ते रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून प्राणायाम आणि योगासने करतात. मुलगा आमदार अनुप अग्रवाल आणि नातू चिरायू यांच्याशी चर्चा करून दिवसभरातील कामांचे नियोजन करतात. कठोर परिश्रम, सातत्य, प्रामाणिकता आणि चेहऱ्यावर नेहमीच असणारे आश्वासक हास्य ही ओपी शेट यांची खरी ओळख आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण करतानाही त्यांचा उत्साह आणि समाजाप्रती असणारी तळमळ तरुणांना लाजवणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT