On Nashik-Pune highway, thieves stole goods worth Rs 15 lakh including tempo  esakal
नाशिक

महामार्गावर चोरट्यांचा प्रताप; टेम्पोसह लांबवला 15 लाखांचा मद्देमाल

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर शिंगोटे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या टेम्पोत झोपलेल्या चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला दगडाने मारहाण करीत त्याच्या ताब्यातील अडीच लाख रुपये किमतीचा टेम्पो, मोबाईल फोन, एक हजार रुपये रोख व हायवा ट्रक बनवणाऱ्या कंपनीचे तेरा लाख दहा हजारांचे साहित्य असा सुमारे साडे पंधरा लाखाचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांना पोबारा केला. मंगळवारी (ता. १६) पहाटे चार वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे शिवारातील बायपास रस्त्यावर दीक्षा हॉटेलजवळ ही घटना घडली.

सुनील अनंतराव बापते (३९, रा. विजयनगर सिडको, नाशिक) हा चालक अम्मा इंजिनिअरिंग कंपनीतून विल्होळी व अंबड येथून साहित्य घेऊन टेम्पोने (एम. एच. १५ ईजी ६०२०) घेऊन चाकणकडे जात होता. मध्यरात्री बापते याने झोप येत असल्याने नांदूरशिंगोटे शिवारात हॉटेल दीक्षाजवळ टेम्पो उभा केला व तो केबिन मध्ये झोपला. पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास त्यास गाडीच्या दरवाजाचा व काचेचा आवाज आल्याने तो दार उघडून बाहेर आला. यावेळी दबा धरुन बसलेले चौघे चोरटे टेम्पोजवळ आले. त्यांनी बापते याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील एक हजार रुपये रोख, मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यास दगडाने मारहाण करुन गाडीतून खाली लोटून दिले.

या घटनेत चोरट्यांनी अडीच लाख रुपये किंमतीचा टेम्पो गाडी व हायड्रोलिक टिपरचे पाच लाख तीस हजार किमतीचे पाच कीट, सात लाख ८५ हजार किमतीचे एक हायड्रोलिक सिलिंडर असा १५ लाख ७० हजाराचा मुद्देमाल घेऊन गाडीसह पोबारा केला. चालकाने परिसरातील हॉटेल चालकांना याबाबत सांगून वावी पोलीस ठाण्यात कळवले. पोलीस ठाण्यात अज्ञात चार चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते उपनिरीक्षक विजय सोनवणे यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Earthquake : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका पक्षात उभी फूट! १२ पैकी ८ आमदार भाजपच्या गोटात; विधानसभेतील समीकरणे बदलली!

Vidhan Bhavan Row : विधानभवनात व्हिजिटर पासेसवरून मोठा वाद! उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अधिकारांना कात्री

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

IND vs WI 5th T20I: ५-५ षटकांचा सामना? पावसाचा धुमाकूळ... किती वाजता टॉस, मॅचची वेळ... घ्या जाणून Cut off टाईम...

VIDEO : सरप्राइज देण्यासाठी अचानक घरी पोहोचली लेक; आईची प्रतिक्रिया पाहून नेटकरीही भावूक

SCROLL FOR NEXT