avinash dusa acc.jpg 
नाशिक

ह्रदयद्रावक! हलाखीची परिस्थिती..अशात दैवाने हिरावला 'त्यांचा' मुलगा..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिन्नर महाविद्यालयासमोर दुचाकी व महाविद्यालयात वळणाऱ्या प्राध्यापकाच्या कारची जोरदार धडक झाली. या अपघातात तरुण ठार झाला. ही घटना बुधवारी (ता. 19) सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी घडली. 

अशी घडली घटना...

अजय ताल्ला (वय 23, रा. अपना गॅरेजवळ) व अविनाश अंबादास दुसा (23, रा. पडकी वेस, तानाजी चौक) हे दोघे दुचाकीवरून माळेगाव औद्योगिक वसाहतीतील नोबेल हायजीन कंपनीत कामावर जात होते. महाविद्यालयाजवळ प्रा. नितीन जाधव (37) कारने (एमएच 15, ईपी 5438) महाविद्यालयाच्या गेटकडे वळत होते. याच वेळी कार व दुचाकीची जोरात धडक झाली. यात दुचाकीवर मागे बसलेला अविनाश रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्‍याला गंभीर मार लागला रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला, तर अजय जखमी झाला.

कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची

अविनाशच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे वडील शहरातील हॉटेलमध्ये कामगार आहेत. आई विडी कामगार आहे. मोठा भाऊ व विवाहित बहीण आहे. कुटुंबाला हातभार लागावा, म्हणून तो मिळेल ते काम करत होता. माळेगाव येथील नोबेल हायजीन कंपनीत तो रोजंदारीवर कामाला होता. बुधवारी नेहमीप्रमाणे कामावर जात असताना, काळाने त्याच्यावर घाला घातला. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर आकाश कोसळले. पद्मशाली समाजाचा तो अत्यंत क्रियाशील युवा कार्यकर्ता होता. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT